इन्स्टाग्रामवर प्रेम, पतीची अडचण! पत्नी आणि प्रियकरानं मिळून काटा काढला, पण एका चुकीमुळे पकडे गेले
समीर 31 मार्चपासून बेपत्ता होता, तर मीरा देखील त्याच दिवशी गायब झाली होती. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा मोबाइल लोकेशनने सगळ्या गोष्टी उघड केल्या.
ADVERTISEMENT

Crime News : प्रेम प्रकरणातून घडणारे अनेक गुन्हे आपल्या समोर येत असतात. अशाच एका घटनेत एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृण हत्या केली. या भयानक कटाची सुरुवात सोशल मीडियापासून झाली. पत्नी मीराचा इन्स्टाग्रामवर एटा येथील रिंकूसोबत प्रेमाचे सूत जुळले. पती समीरला हे कळल्यानंतर त्यांनी याला विरोध केला. त्यावेळी पत्नी आणि प्रियकरने मिळून त्याला ठार मारण्याचा कट रचला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 एप्रिल रोजी समीरच्या वहिनीने पोलिस अधीक्षकांना तक्रार दिली. यामध्ये तिने मीरावर परपुरुषाशी संबंध ठेवले असल्याचा आरोप केला. तसंच समीर बेपत्ता करण्यातही तिचाच हात असल्याचा आरोप केला.
हे ही वाचा >> इन्स्टाग्रामवर हवा करण्यासाठी पठ्ठ्याने थेट शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारालाच धमकी दिली, प्रकरण काय?
समीर 31 मार्चपासून बेपत्ता होता, तर मीरा देखील त्याच दिवशी गायब झाली होती. पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा मोबाइल लोकेशनने सगळ्या गोष्टी उघड केल्या. समीर, मीरा आणि रिंकू यांचं शेवटचं लोकेशन हाथरसच्या सिकंदराराऊ येथे आढळलं.
1 एप्रिल रोजी तिथल्या महामार्गावर एक अज्ञात मृतदेह आढळला होता, त्याची ओळख न पटल्याने त्याचा अंतिम संस्कार करण्यात आला. पोलीस तपासात तो मृतदेह समीरचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. पती प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यानं मीराने रिंकू आणि त्याचा मावस भाऊ नीलेश यांच्यासोबत मिळून हत्येचा कट रचला.










