Crime : सहा महिन्यापुर्वी झालं लग्न, झोपेत भलत्याच पुरूषाच...

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

uttar pradesh crime wife took brother in law name while sleeping husband angree over habit shocking crime story
या घटनेतील महिला झोपेत भलत्याच व्यक्तीचे नाव घ्यायची.
social share
google news

Uttar pradesh crime News : पती-पत्नीमध्ये शुल्लक कारणावरून भांडण, वाद होतच असतात. त्यात काय नवीन नाही. मात्र येथे भलतीच घटना घडली आहे. या घटनेतील महिला झोपेत भलत्याच व्यक्तीचे नाव घ्यायची. तिच्या या सवयीने नवरा चांगलाच वैतागला होता. घटनेच्या दिवशी देखील असाच प्रकार घडला. त्यानंतर नवऱ्याने संतापून बायकोला उठवून तिच्यासोबत बेदम मारहाण केली होती. हे प्रकरण सध्या पोलीस ठाण्यात पोहोचले आहे.  (uttar pradesh crime wife took brother in law name while sleeping husband angree over habit shocking crime story) 

ADVERTISEMENT

उत्तर प्रदेशच्या रामपुरमधील आजीमनगर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेतील तरूणाचे सहा महिन्यापुर्वी लग्न झाले होते. लग्नाचे सुरूवातीचे दिवस खुप चांगले गेले. त्यानंतर काही दिवसांनी तरूणाला त्याच्या बायकोबाबत एक विचित्र गोष्ट कळाली. तरूणाची बायको ही झोपेत असताना एका व्यक्तीने नेहमी नाव घ्यायची. तिची ही गोष्ट नवऱ्याला खूपदा खटकायची. मात्र यावर त्याने बायकोला विचारणा केली नव्हती. 

हे ही वाचा : "श्रीनिवास बापू आमचं ठरलंय...", अजित पवारांच्या भावाला प्रत्युत्तर

दरम्यान जसे जसे दिवस पुढे जात होते, तसे तसे बायकोची सवयही वाढतच होती. त्यामुळे बायकोच्या या सवयीची नवऱ्याला चीड यायला लागली होती. घटनेच्या दिवशी देखील दोघे नवरा-बायको त्यांच्या बेडरूममध्ये झोपले होते. यावेळी बायकोला झोप लागताच तिने पुन्हा नाव उच्चारायला सूरूवात केली. खरं तर तरूणाची बायको ही झोपेत तिच्या भावोजीचे नाव घ्यायची. त्यामुळे नवऱ्याला याची प्रचंड चीड यायची.

हे वाचलं का?

 त्या दिवशी देखील असाच प्रकार घडला. त्यानंतर नवऱ्याने बायकोला जाग करून तिच्यासोबत भांडणाला सुरुवात केली. या भांडणानंतर सर्व कुटुंब जागं झालं आणि मोठा राडा झाला. यावेळी तरूणाने तिच्या बायकोला मारहाण देखील केली आणि तिच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले. या आरोपावर महिलेने मला झोपेत भयानक स्वप्न येतात, त्यामुळे स्वप्नात मी भावोजीचे नाव घेतले असल्याचे सांगितले होते. 
 
बायकोने स्पष्टीकरण देऊन देखील नवऱ्याचा राग काही शांत झाला नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी नवऱ्याने मुलीच्या कुटुंबियांना बोलावून घेतले आणि त्यांच्यासमोर पुन्हा बायकोसोबत भांडण केले. यानंतर भांडणाचा हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला होता. पोलिसांनी यावेळी नवरा-बायकोची समजुत काढत, त्यांच्यातील भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. दोघामधील वाद मिटल्यानंतर पोलिसांनी दोघांना घरी पाठवले होते. 

हे ही वाचा : शिंदे-पवारांमुळेच भाजपवर राज ठाकरेंना सोबत घेण्याची वेळ आली?

सध्या नवरा-बायकोतला हा वाद मिटला आहे. पण बायको झोपेत परपुरुषाचे नाव घेत असल्याने ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT