नातू रडला म्हणून आजोबांनी डोकंच फोडलं, सुनेचीही केली क्रूर हत्या
दोन वर्षाचा नातू रडू लागल्यावर त्याचा रडण्याचा आवाज सहन झाला नाही म्हणून आजोबांनी काठीने त्याचे डोकचं फोडलं, तर आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आलेल्या आईवरही आजोबांनी हल्ला केल्याने दोघांचाही जीव गेला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
UP Crime : उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये दुहेरी हत्याकांड (Murder Case) झाल्याने खळबळ माजली आहे. लहान मुलाच्या रडण्याने त्रस्त झालेल्या एका व्यक्तीने आपल्या 2 वर्षाच्या नातवाची आणि सुनेची धारदार शस्त्राने हत्या केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या घटनेमुळे साऱ्या गावावर शोककळा पसरली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT
नातू जागीच झाला गतप्राण
पोलीस अधीक्षक चक्रेश मिश्रा यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, देवरिया गावात राहणारा आरोपी कमता प्रसाद उर्फ कमो (वय 50) याची मानसिक अवस्था चांगली नव्हती. त्याचा 2 वर्षाचा नातू आयुष रडत होता म्हणून त्याच्यावर आधी त्याने हल्ला केला. त्यावेळी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या आईवरही त्याने हल्ला केला. या हल्ल्यात आयुष जागीच ठार झाला होता, तर त्याची आई शिखा हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हे ही वाचा >> Rape Case: अश्लील Video शूट करून दोन भावांचा बहिणीवर गँगरेप, गर्भवती झाल्यावर…
पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी धाव
ही घटना घडली तेव्हा आयुषचे वडील घरी नव्हते. आयुषचे वडील अक्षय कुमार नोकरीनिमित्त पंजाबमध्ये राहतात. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. तर दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
हे वाचलं का?
आरोपी मानसिकदृष्ट्या आजारी
यावेळी पोलिसांनी सांगितले की, संबंधित आरोपी हा मानसिकदृष्ट्या आजारी होता. त्याला लहान मुलाच्या रडण्याने त्रास झाला होता. त्यामुळे त्याने आधी मुलावर हल्ला करून नंतर त्याला वाचवण्यासाठी आलेल्या बाळाच्या आईवर हल्ला करून तिलाही गंभीर जखमी केले होते. या दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला असून कमलकांत या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हे ही वाचा >> BJP: विनोद तावडे ठरवणार, कोण होणार मुख्यमंत्री…!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT