डॉक्टरने पत्नी, मुलांचं डोकं हातोड्यानं ठेचलं, सगळं कुटुंबच क्रूरपणे का संपवलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

uttar pradesh Ophthalmologist killed the family by hitting his wife and children on the head with hammer
uttar pradesh Ophthalmologist killed the family by hitting his wife and children on the head with hammer
social share
google news

Family Murder Case : रायबरेलीमधील मॉडर्न रेल कोच फॅक्टरीच्या निवासी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वे कोच फॅक्टरीतील (Railway Coach Factory) अतिरिक्त विभागीय वैद्यकीय अधिकारी अरुण सिंग यांनी पत्नी (Wife) अर्चना, मुलगा (Son) आरव आणि मुलगी (Daughter Murder) आदिवा यांची हत्या करून त्यांनी स्वतःह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या हत्याकांडामुळे मोठी खळबळ उडाली असून पोलिसानाही धक्का बसला आहे. एका डॉक्टरने सगळं कुटुंब संपवण्याचं नेमकं कारण काय असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

सगळ्यांनाच नशेचं इंजेक्शन

हे प्रकरण लालगंज कोतवालीमधील मॉडर्न रेलकोच फॅक्टरीच्या निवासी संकुल परिसरात घडली आहे. जहाँ येथील रहिवासी नेत्रतज्ज्ञ डॉ. अरुण कुमार यांनी प्रथम त्यांच्या कुटुंबीयांना नशेचे इंजेक्शन दिले. त्यानंतर सर्वांची हातोड्याने मारहाण करून त्यांना ठार करण्यात आले. कुटुंबातील सगळ्यांना मारून डॉक्टरांनी नंतर आपण स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. निवासी संकुल परिसरात एकाच वेळी चार जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा >> Solapur : शिक्षणाधिकाऱ्याच्या घरात सापडलं तब्बल 6 कोटींचं घबाड, कुठून आली ‘इतकी’ सपत्ती?

सगळं कुटुंबच रक्ताच्या थारोळ्यात

आरपीएफने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. ही घटना घडताच पोलीस अधीक्षक आलोक प्रियदर्शी, अतिरिक्त एसपी, सीओ आणि फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहचल्यावर घराचा दरवाजा तोडन आतमध्ये प्रवेश करण्यात आला. यावेळी डॉक्टरचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला तर पत्नी आणि मुलांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले.

हे वाचलं का?

नस कापून घेतला गळफास

पोलीस अधीक्षक प्रियदर्शी यांनी या घटनेची माहिती सांगताना म्हणाले की, मिर्झापूरचे रहिवासी असलेले डॉ. अरुण कुमार हे डिप्रेशनमध्ये होते. त्यांनी पत्नी व मुलांची हत्या करताना त्यांना आधी नशेचे इंजेक्शन दिले होते, त्यानंतर पत्नी व दोन मुलांच्या डोक्यात जड वस्तूने वार करून त्यांची हत्या केली आहे. त्यानंतर त्यांनी स्वतःलाही जखमी करून घेऊन स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना घडल्यानंतर त्या परिसरातील लोकांनी सांगितले की, डॉक्टरला आणि त्यांचे कुटुंब रविवारी सगळ्यांना दिसले होते, मात्र रविवारनंतर त्यांच्यातील कोणीच दिसले नव्हते.

डॉक्टर स्वतःच डिप्रेशनमध्ये

पोलिसांनी सांगितले की, ज्या डॉक्टराने हा धक्कादायक प्रकार केला आहे. ते रेल्वे कोच फॅक्टरीत अतिरिक्त विभागीय वैद्यकीय अधिकारी होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते डिप्रेशनमध्ये होते. मात्र पत्नी व मुलांना नशेचे इंजेक्शन देऊन त्यांनी स्वतःची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नंतर त्यांनी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Lok Sabha: ‘नेहरूंनी 2 घोडचुका केल्या होत्या, एक तर…’, अमित शाहांच्या विधानाने संसदेत प्रचंड गोंधळ

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT