Lok Sabha: ‘नेहरूंनी 2 घोडचुका केल्या होत्या, एक तर…’, अमित शाहांच्या विधानाने संसदेत प्रचंड गोंधळ

रोहित गोळे

ADVERTISEMENT

lok sabha winter session 2023 pandit nehru had made 2 blunder amit shah statement caused huge uproar in parliament jammu and kashmir reservation amendment bill
lok sabha winter session 2023 pandit nehru had made 2 blunder amit shah statement caused huge uproar in parliament jammu and kashmir reservation amendment bill
social share
google news

Amit Shah in Lok Sabha: नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयक-2023 यावर बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर आणि विशेषत: दिवंगत माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या काश्मीरसंबंधीच्या निर्णय प्रक्रियेवर जोरदार हल्ला चढवला. नेहरूंनी दोन घोडचुका केल्या असं विधान त्यांनी लोकसभेत केलं. ज्यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला आणि त्यानंतर विरोधकांनी सभात्यागही केला. (lok sabha winter session 2023 pandit nehru had made 2 blunder amit shah statement caused huge uproar in parliament jammu and kashmir reservation amendment bill)

‘पंडीत जवाहरलाल नेहरूंनी दोन घोडचुका केल्या’, अमित शाहांचं भाषण जसंच्या तसं…

‘एका सदस्याने काही म्हटलं.. त्यावेळी एका शब्दावर बराच आक्षेप घेण्यात आला. मी त्या शब्दाला अनुमोदन देण्यासाठी मी माझं म्हणणं मांडत आहे. मी त्या शब्दप्रयोगाला पाठिंबा देत आहे. तो शब्दप्रयोग होता नेहरूयीन ब्लंडर.. नेहरुंच्या काळात ज्या चुका झाल्या होत्या.. ज्यामुळे काश्मीरला बरंच भोगावं लागलं.’

‘मी या संसदेत अतिशय जबाबदारीने सांगतो की, दोन मोठ्या चुका पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधान पदाच्या काळात झाल्या.. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे झाल्या. यामुळे काश्मीरला अनेक वर्ष सहन करावं लागलं.’

‘सगळ्या पहिली मोठी चूक.. जेव्हा आपलं लष्कर हे जिंकत होतं पण पंजाबचा परिसर येतात शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा जन्म झाला. जर शस्त्रसंधी तीन दिवस उशिरा घोषित झाली असती तर पाकव्याप्त काश्मीर हा भारताच भाग असता.’

हे ही वाचा >> Uddhav Thackeray : अदाणींना विरोध… ठाकरे काँग्रेससोबत, पण राजकारण काय?

दरम्यान, अमित शाह यांच्या या विधानानंतर लोकसभेत बराच गदारोळ झाला. अमित शाह चुकीच्या पद्धतीने विधानं करत असल्याचं म्हणत विरोधकांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला. पण लोकसभा अध्यक्षांनी अमित शाह यांना संरक्षण देत त्यांचं भाषण सुरू ठेवण्यास सांगितलं.

हे ही वाचा >> किम जोंग महिलांसमोरच ढसाढसा रडला, भरसभेत नेमकं घडलं काय?

‘एकच चूक सांगितली तर यांचा एवढा जळफळाट झाला. पण मी दोनच चुका सांगणार आहे. एक पूर्ण काश्मीर जिंकल्याशिावाय सीजफायर केलं. तर दुसरी चूक म्हणजे संयुक्त संस्थेतत आपला मुद्दा घेऊन जाणं.’

‘संयुक्त राष्ट्रसंघात आलेला अनुभव.. मी निष्कर्षापर्यंत आलो आहे की, तिथून काही समाधानकारक निर्णयाची आशा करता येणार नाही. मला हा एक चांगला निर्णय वाटला, पण हा मुद्दा योग्यरित्या हाताळला गेला नाही.’

‘मी तर नेहरूजींबाबत बोलत आहे.. ते माझ्यावर का रागवत आहेत? त्यांना रागवायचं असेल तर त्यांनी नेहरुंविरोधात व्हायला हवं.’

‘त्यावेळी जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघात प्रकरण पाठवायचं होतं तेव्हाही निर्णय अत्यंत तडकाफडकी घेतलेला. काही लोकांना माझी भाषा… मी काय करू शकतो..’

‘मी या देशाची भाषा बोलतो.. म्हणजे या देशाची भाषा तामिळही आहे, हिंदीही आहे.. बंगाली, मराठी.. तेलुगूही आहे. कन्नडही आहे.. तर कोणी गुजरातीही बोलू शकतं. पण मी हिंदीत बोलतो पण तुम्ही अनुवाद नीट ऐकत नाही. मी जे काही वाचलं ते जवाहरलाल नेहरूंनी लिहलं आहे.’

‘नेहरू तेव्हा म्हणाले होते की, ती माझी ‘मिस्टेक’ होती.. पण ती मिस्टेक नव्हती.. ते ‘ब्लंडर’ (घोडचूक) होतं. या देशाची एवढी जमीन गेली, भूमी गेली ते ब्लंडर होतं. ऐतिहासिक ब्लंडर होतं.’

‘ब्लंडर म्हटलं तर एवढे नाराज झाले विरोधक… हिमालयीन ब्लंडर म्हटलं असतं तर राजीनामा देऊनच निघून गेले असते ते..’ असं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT