मुंबईतील माजी पोलीस उपायुक्तांच्या मुलगा आणि सुनेला कोणी फसवलं?, 'ही' स्टोरी तुम्हालाही टाकेल चक्रावून!
मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस आयुक्ताच्या मुलाची आणि सूनेची सायबर क्राइमद्वारे फसवणून झाली असल्याची समोर आलं आहे. या दोघांना सायबर गुन्हेगारांनी दीड लाखांची फसवणूक केली असल्याची माहिती मिळाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

माजी पोलीस उपायुक्तांच्या मुलगा आणि सूनेची परदेशात फसवणूक

मुंबईतील सायबर क्राइमची घटना आली समोर

माजी पोलीस उपायुक्तांच्या सूनेला दीड लाखांचा गंडा
Mumbai Cyber Crime: आजकाल वाढत्या टेक्नॉलॉजीसोबत सायबर क्राइमच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी सुशक्षित लोकही सायबर क्राइमच्या विळख्यात अकडत असल्याच्या बातम्या समोर येत असतात. अशातच, मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस आयुक्ताच्या मुलाची आणि सूनेची सायबर क्राइमद्वारे फसवणून झाली असल्याची समोर आलं आहे. या दोघांना सायबर गुन्हेगारांनी दीड लाखांची फसवणूक केली असल्याची माहिती मिळाली आहे.
नेमकं काय घडलं?
खरंतर, माजी पोलीस उपायुक्त अंबादास पोटे मुंबईतील बोरीवलीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहतात. त्यावेळी उन्हाळी सुट्टीनिमित्त त्यांनी परदेशात सहलीसाठी जाण्याचे ठरवले. त्यावेळी त्यांच्या सूनेने इंटरनेटवर स्वस्त बुकींग करुन देण्याऱ्या ट्रॅव्हल कंपनीचा शोध घेतला. शोध घेतल्यानंतर त्यांना तिथे केनील ट्रॅव्हल्स नावाची कंपनी सापडली. यानंतर त्यांना परदेशात सहलीसाठी बुकींग करण्यासाठी 4 जणांना 2 लाख रुपये लागणार असल्याची माहिती कंपनीने दिली. दर स्वस्त असल्यामुळे त्यांनी या कंपनीमार्फत सहलीसाठी बुकींग करण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा: रात्रीस खेळ चाले! महिलांचे कपडे परिधान करत 41 लाखांची चोरी
सांगितल्याप्रमाणे, चित्रगंधा म्हणजेच अंबादास पोटेंच्या सूनेकडून 7 एप्रिल रोजी विमानाची तिकीटं काढण्यासाठी 88 हजार रुपये, तर 21 एप्रिल रोजी हॉटेल बुकिंगसाठी 1.12 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. यानंतर कंपनीने परदेशातील हॉटेलमध्ये बुकींग झाल्याची पावती पाठवली. 17 मे रोजी चित्रगंधा त्यांच्या पती आणि मुलांसोबत हॉटेलमध्ये पोहोचल्या मात्र तेव्हा या नावाने कोणतीही नोंदणी नसल्याचे त्यांना समजले.
सुरुवातीला काढलेली विमानाची तिकीटं आणि हॉटेल बुकींग रद्द झालं असल्याचं समोर आलं. यानंतर त्यांनी ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र मालकाचा फोन बंद असल्याचं कळालं. यावरुन त्यांना सायबर फसवणूक झाल्याचा संशय आला. असं घडल्यानंतर त्यांनी स्वत:च्या खर्चाने तिथे राहण्याची आणि भारतात परत येण्याची व्यवस्था केली.
हे ही वाचा: काकीनं पुतण्याला संपवलं, मृतदेहाचे तुकडे सिमेंटच्या... पुन्हा 'मेरठ'सारखीच घटना, अश्लील फोटोवरुन...
सायबर पोलिसांकडे तक्रार
या प्रकरणी माजी पोलीस उपायुक्त अंबादास पोटे यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. यानंतर केनील ट्रॅव्हल कंपनीच्या मालकाच्या विरोधात 1 लाख 64 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्याही अनोळखी वेबसाईटवर किंवा व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. तसेच, ऑनलाईन पेमेंट करताना विशेष काळजी घ्यावी, असं पोलिसांनी लोकांना आवाहन केलं आहे.