रात्रीस खेळ चाले! महिलांचे कपडे परिधान करत 41 लाखांची चोरी
Mumbai Crime News : मुंबईतील मलाडमध्ये शक्कल लढवून चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी अटक केली आहे. चोर हा दिवसा रेकी करायचा आणि रात्री महिलेच्या वेशात चोरी करायला यायचा. या हुशार चोराने मुंबईतील मलाड, कांदिवली, बोरिवली आणि दिंडोसी भागामध्ये अनेक चोऱ्या केल्या आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईतील मलाडमध्ये महिलेच्या वेशात चोरी करणाऱ्या चोराला अटक

मलाड, कांदिवली, बोरिवली आणि दिंडोसी भागामध्ये अनेक चोऱ्यांचा होता आरोप
Mumbai Crime News : मुंबईतील मलाडमध्ये शक्कल लढवून चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी अटक केली आहे. चोर हा दिवसा रेकी करायचा आणि रात्री महिलेच्या वेशात चोरी करायला यायचा. या हुशार चोराने मुंबईतील मलाड, कांदिवली, बोरिवली भागामध्ये अनेक चोऱ्या केल्या आहेत.
हेही वाचा : नवऱ्याला सोडून दिलं; परपुरूषाला केलं जवळ, त्याच पुरूषानं आधी महिलेचे केलं लैंगिक शोषण, नंतर तिच्याच मुलीवर...
चोरी करताना चोर दररोज शक्कल लढवायचा. हा चोर रेल्वे स्थानकातील आसपासच्या भागामध्ये चोरी करायला यायचा. सीसीटीव्हीत आपली ओळख पटू नये म्हणून तो चोरी करताना रेल्वे ट्रॅकवर जाऊन महिलांचे कपडे परिधान करायचा. चोरीनंतर तो पुन्हा रेल्वे ट्रॅकवर यायचा आणि परिधान केलेले महिलांचे कपडे काढायचा. त्यानंतर गर्दीचा फायदा घेऊन तिथून पळ काढायचा.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी चोराचे नाव हे रणजीत कुमार उर्फ मुन्ना असे आहे. बिहारमधील खगरिया जिल्ह्यातल रहिवासी आहे. आरोपींकडून 36 तोळे हिरे जडवलेले सोन्याचे दागिने, 1 किलो चांदी आणि 13 लाख बँक ठेवी रक्कम, सोने वितळवण्याचे यंत्र, छिन्नी हातोडा सर्वकाही जप्त करण्यात आलं आहे.
चोरांकडून जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांची किंमत ही तब्बल 41 लाख रुपये रक्कम आहे. शिवाय त्याने बिहारमधील जमीन खरेदी करण्यासाठी 10 लाख रुपये आणि मालवणीत घर खरेदी करण्यासाठी 6 लाख रुपये दिले होते. मालाड पोलिसांनी सर्व वस्तू जप्त केल्या आहेत.