प्रेमात अडथळा, विधवा सूनेने प्रियकराच्या साथीने सासऱ्याचाच केला गेम

मुंबई तक

ADVERTISEMENT

uttar Pradesh three murder obstructed love widowed daughter-in-law kills father-in-law along with lover
uttar Pradesh three murder obstructed love widowed daughter-in-law kills father-in-law along with lover
social share
google news

Crime News: उत्तर प्रदेशातील गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याचे ताजे उदाहरण बिजनौरमधील (Bijnor) आहे. तिथं अवघ्या 4 दिवसांमध्ये 3 जणांची हत्या झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. तर दुसरीकडे आश्चर्याची ही बाब आहे की, उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणाचा सरकार नारा देत असतानाही येथे 4 दिवसांमध्ये 2 महिलांची हत्या करण्यात आली आहे. वेगवेगळ्या घटनांमध्ये एका महिलेसह तीन हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. अनैतिक संबंधातून दोन हत्या (Murder) झाल्याचे पोलिसांनी खुलासा केला आहे. एका घटनेत एका महिलेचा मृतदेह राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्या महिलेच्या नाका-तोंडातून रक्त आल्याचे दिसून येते होते.

ADVERTISEMENT

चार दिवसात तीन हत्या

वेगवेगळ्या झालेल्या या हत्या बिजनौरमधील वेगवेगळ्या परिसरात घडल्या आहेत. गेल्या चार दिवसांत म्हणजे 23 ते 26 जानेवारीच्या काळात 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांची हत्या झाली आहे. यामधील दोन हत्या झालेल्यांच्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसरी हत्या झाली आहे, त्या प्रकरणातील आरोपी पकडताना मात्र पोलीस फक्त अंदाज व्यक्त करत आहेत.

हे ही वाचा >>Crime : नागपूर हादरलं! इंजिनियर तरूणीवर तब्बल 5 वर्षे बलात्कार, पैसे देखील उकळले

सूनेने सासऱ्याची केली हत्या

बिजनौरमधील स्योहारा गावातील हम्मा नगलीमध्ये राहत असलेल्या संतरामची हत्या ही रात्रीच्या वेळी झाली. संतरामची हत्या त्याच्या विधवा सूनेच्या प्रियकराने केल्याचे पोलिसांनी सांगितले. विधवा सूनेचा प्रियकर जितू आणि त्याचा मित्र गौरवने ही हत्या केल्याचे त्यांनी सांगितले. सासऱ्याची हत्या करताना त्याची गळा दाबून हत्या केल्याचे उघड झाले आहे. संतरामचा मृतदेह घरात सापडल्याचे पोलिसांना समजल्यानंतर त्याचा मृतदेह थंडीमुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदनानंतर संतरामचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांच्या तपासानंतर ही हत्या त्याच्या सूननेच केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सूनेला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आले. त्या तिघांनीही ती हत्या आपणच केल्याचे कबूल केले आहे.

हे वाचलं का?

अल्पवयीन मुलांनी केली हत्या

तर 26 जानेवारी रोजी हलदौरमधील मोहल्ला भूडमध्ये पंकजची हत्या ही दगडाने आणि विटेने ठेचून झाल्याचे सांगण्यात आले आहे. तर त्यानंतर काचेनेही त्याचा गळा चिरला होता.पोलिसांना पंकजचा मृतदेह बेवारस स्थितीत पडला होता. त्याच्या मृतदेहाजवळच पंकजची स्कूटरही सापडली आहे. पंकजच्या मृत्यूप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशीत दोन्ही अल्पवयीन मुलांनी सांगितले की, त्यांच्या वहिणीबरोबर पंकजचे अनैतिक संबंध होते. त्या दोन्ही मुलांना हे समजल्यानंतर 26 जानेवारी रोजी पंकजला त्या दोघांनी दारू पाजली होती, त्यानंतर त्याची दगडाने ठेचून त्यांनी त्यांची हत्या केली.

रस्त्याकडेला महिलेचा मृतदेह

तर तिसऱ्या एका घटनेच नजमा नावाच्या महिलेचाही मृतदेह रस्त्याकडेला सापडला होता. मृतदेहाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तिच्या नाका-तोंडातून रक्ताच्या खूणा आल्याचे दिसत होते. त्याच बरोबर तिच्या अंगावरील दागिनेही पळवल्याची तक्रार तिच्या नवऱ्याने केली आहे. चार दिवसानंतरही आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Sanjay Raut : …तेव्हा ईडीची शाई संपते का? राऊतांचा सरकारवर घणाघात

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT