Triple Murder : एकाच कुटुंबीतील तिघांचा चिरला गळा, नंतर लोकांनी आरोपीचं घरच पेटवलं - Mumbai Tak - uttar pradesh kaushambi triple murder crime news - MumbaiTAK
गुन्ह्यांची दुनिया बातम्या

Triple Murder : एकाच कुटुंबीतील तिघांचा चिरला गळा, नंतर लोकांनी आरोपीचं घरच पेटवलं

Triple Murder : उत्तर प्रदेशातील मोईनुद्दीनपूर गौसमध्ये जमिनीचा वाद टोकाला जावून तिघांची निघृण हत्या करण्यात आली आहे. बाप, मुलगी आणि जावयाची हत्या करण्यात आल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोपीचं घर पेटवून दिलं आहे तर, पोलिसांना मृतदेह ताब्यात घेण्यासही विरोध केला आहे.
Uttar pradesh triple murder

Triple Murder : उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या प्रमाणात प्रचंड वाढ होताना दिसते आहे. गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाच महिलांच्या सुरक्षितेतचाही प्रश्न ऐरणीवर आला होता. एकीकडे उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली जात असतानाच कौशांबी जिल्ह्यात जमिनीच्या वादातून तिघांची निघृणपणे हत्या (murder) करण्यात आली आहे. तिघांची हत्या झाल्याचे समजताच मोईनुद्दीनपूर गौस गावातील नागरिकांनी संतप्त होत, हत्या करणाऱ्यांच्या घरांना आग लावली आहे. नागरिकांनी केलेल्या जाळपोळीनंतर पोलिसांनी गावात येत मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींना आधी ताब्यात घ्या नंतर मृतदेह ताब्यात देणार असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

जमिनीचा धुमसता वाद

मोईनुद्दीनपूर गौसमध्ये गेल्या काही दिवसांपासून जमिनीचे वाद सुर होते. त्या वादातून गावामध्ये तिहेरी हत्याकांड झाले. हत्या झाल्याचे समजताच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गावातील अनेक घरांना आग लावून आरोपींना ताब्यात घेण्याची मागण नागरिकींनी केली आहे. गावामध्ये जाळपोळीची घटना घडल्यामुळे गावाला आता पोलिसी छावणीचे रुप प्राप्त झाले आहे.

हे ही वाचा >> ‘अजित पवारांना वाटतं पाप केलं’ संजय राऊतांनी राष्ट्रवादीतील खदखद सांगितली

बाप, मुलगी आणि जावयालाही चिरले

सांदीपनघाट पोलीस हद्दीतील मोईनुद्दीनपूर गौसमध्ये होरीलाल यांचा त्याच गावातील सुभाष याच्याबरोबर जमिनीच्या हद्दीवरून जोरदार वाद झाला होता. त्यांच्या जमिनीचा वाद दिवसभर धुमसत होता. त्यानंतर शुक्रवारी सकाळी होरीलाल, त्यांची मुलगी ब्रिजकली आणि जावई शिवशरण या तिघांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. या घटनेची गावात माहिती मिळताच ग्रामस्थांनी सुभाष यांच्या घराला आग लावण्यात आली. त्याचबरोबर त्याना सहकार्य करणाऱ्यांच्या घरालाही आग लावण्यात आली. या आगीत घरे आणि दुकानेही पेटवून देण्यात आली आहेत.

हे ही वाचा >> Gokul Dudh Sangh Meeting : बॅरिकेट्स तोडण्याचा… गोकुळच्या सभेत राडा, प्रकरण काय?

आरोपींची घरं जाळली, दुकानं पेटवली

मोईनुद्दीनपूर गौसमध्ये हत्याकांड होऊन जाळपोळ झाल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी हत्या झालेले मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेण्याआधी आरोपींना ताब्यात घेण्याची विनंती केली. त्यावरून वाद होऊन आरोपींच्या घरांना आग लावून काही दुकानंही पेटवून देण्यात आली. त्यामुळे हा वाद टोकाला गेल्या असून गावामध्ये पोलीस संरक्षण वाढवले आहे.
पोलीस जोपर्यंत हत्या करणाऱ्यांना ताब्यात घेत नाहीत, तोपर्यंत मृतदेह पोलिसांना ताब्यात घेऊ देणार नाही असा पवित्रा मोईनुद्दीनपूर गौसमधील ग्रामस्थांनी घेतला आहे. सध्या पोलीस शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र अजूनही पोलिसांना मृतदेहांना हात लावू दिला गेला नाही.

World Heart Day: तुम्हाला पण ‘ही’ लक्षणं दिसतायेत? वेळीच डॉक्टरांकडे जा, नाहीतर… Eknath Shinde : श्रीकांत शिंदे उतरले पाण्यात… मुख्यमंत्र्यांनी बाप्पाला कसा दिला निरोप? Priyanka Chopra: सुंदर दिसण्यासाठी सर्जरी केली अन् प्रियांका कशी फसली? Dengue : डेंग्यू झाल्यास ‘या’ गोष्टी अजिबात विसरू नका, एक चूक पडेल महागात Esha Gupta : आउटडोर शुटच्या बहाण्याने…, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव Ganpati 2023: गणपती बाप्पासोबत ‘मोरया’ का म्हणतात? पितृ पक्ष उद्यापासून होणार सुरू! का आहे एवढं महत्त्व? Dengue food not to eat : डेंग्यू झाल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका! Rashmika Mandanna चा 6 वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा, आता… बघावं ते नवलच! ‘या’ बाळालाही आली दाढी मिशी… कोहलीशी पंगा घेतला, खेळाडूचा 24 व्या वर्षी अचानक क्रिकेटमधून संन्यास लालबागचा राजा निघाला! भेटीसाठी मुंबईच्या रस्त्यावर भक्तांचा ‘महापूर’ आत्मविश्वास वाढवण्यासाठी महिलांनी ‘या’ टिप्स नक्की करा फॉलो! Ganpati Visarjan 2023: लालबागच्या राजाची थाटात मिरवणूक! बनला ‘चंदू चायवाला’ पण चमकलं असं नशीब की… Alia Bhatt ने वाढदिवसाला सांगितलं रणबीर कपूरचं सीक्रेट! Raveena Tandon चं करिअर करिष्मामुळे फ्लॉप? म्हणाली.. अभिनेत्रीला सेटवरून काढलं, लोकप्रिय होऊनही करावा लागला संघर्ष! रवीना-अक्षयचं झालं होतं ब्रेकअप? पहिल्यांदाच EX वर दिली प्रतिक्रिया Jio vs Airtel: सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कोण देणार?