पतीने पत्नीला बाईकवर बसवलं..लॉजमध्ये नेलं अन् पत्नीचे काढले न्यूड फोटो ! पोलीस येताच असं काही घडलं..

मुंबई तक

Husband-Wife Shocking Viral News : पती-पत्नीच्या नात्याला खूप पवित्र मानलं जातं. पण जेव्हा या दोघांमध्ये अविश्वास निर्माण होतो, तेव्हा त्यांच्यात वादाची ठिणगी पेटते.

ADVERTISEMENT

Husband And Wife Shocking Viral News
Husband And Wife Shocking Viral News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पतीने पत्नीचे काढले न्यूड फोटो, व्हायरल करण्याची दिली धमकी

point

त्या लॉजवर नेमकं काय घडलं?

point

पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

Husband-Wife Shocking Viral News : पती-पत्नीच्या नात्याला खूप पवित्र मानलं जातं. पण जेव्हा या दोघांमध्ये अविश्वास निर्माण होतो, तेव्हा त्यांच्यात वादाची ठिणगी पेटते. अनेकदा हे वादविवाद इतके वाढतात की, कुणाचंतरी आयुष्य उद्ध्वस्त होतं. काही प्रकरणात पती-पत्नीकडून टोकाचे निर्णय घेतले जातात. चेन्नईत अशाच प्रकारचा धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. रिपोर्टनुसार, पती-पत्नी बाईक राईड करायला निघाले. त्यानंतर त्यांनी एका लॉजवर रूम बुक केली. पण त्या ठिकाणी एक भयंकर घटना घडली. पोलीस आता या घटनेचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एक 28 वर्षांची आयटी प्रोफेशनल महिलेनं मंगळवारी रात्री चेन्नईच्या वानागारम येथील घरात पतीला रुममध्ये बंद केलं. त्यानंतर महिलेनं पोलिसांना याबाबत माहिती दिली. महिलेनं तक्रारीत म्हटलं आहे की, तिच्या पतीनं तिचे गुपचूप नग्न फोटो काढले आणि सोशल मीडियावर व्हायरल करणार असल्याची धमकी दिली. महिला आणि आरोपी पतीचं लग्न 2023 मध्ये झालं होतं. लग्नाच्या काही महिन्यानंतर पतीनं दारूच्या नशेत महिलेला मारहाण केली होती. त्यानंतर जुलै 2024 मध्ये पत्नी बंगळुरुत तिच्या माहेरी गेली होती.

हे ही वाचा >> Digital Arrest: अरे देवा.. बाथरूमही सोडलं नाही, निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्ट; तब्बल दीड कोटी...

दोघेही लॉजमध्ये गेले अन नंतर घडली भयंकर घटना

जेव्हा आरोपीला माहित झालं की, त्याची पत्नी घटस्फोट देण्याच्या अर्जाच्या तयारीत आहे. तेव्हा त्याने तिची माफी मागून भेटण्यासाठी सांगितलं. दोन महिन्यापूर्वी तो बंगळुरुत गेला आणि महिलेची माफी मागत पुन्हा दारू पिणार नाही, अस वचन दिलं. तो महिलेला बाईकवरून कुन्नूरला फिरायला घेऊन गेला. तिथे दोघेही एका लॉजमध्ये थांबले. तिथे त्याने गुपचूप महिलेचे अश्लील फोटो काढले.

हे ही वाचा >> घोर कलियुग! मुलगा पडला सावत्र 'मम्मी'च्या प्रेमात जडलं प्रेम, पळून गेले अन्; वडिलांनी तर..

मारहाण केल्यानंतर धमकी दिली

घरी परतल्यानंतर पतीने महिलेला पुन्हा मारहाण केली. जेव्हा महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली, तेव्हा त्याने तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेनं आरोपीला रुममध्ये बंद केलं. त्यानंतर ती पोलीस स्टेशनला गेली आणि घडलेला प्रकार सांगितला. वानागारम पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला अटक केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp