Digital Arrest: अरे देवा.. बाथरूमही सोडलं नाही, निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्ट; तब्बल दीड कोटी...

मुंबई तक

Digital Arrest Case: बनावट सीबीआय आणि ट्राय अधिकारी असल्याचे भासवून निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला तब्बल दीड कोटी रुपयांना लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
निवृत्त सरकारी अधिकाऱ्याला डिजिटल अरेस्ट (प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: AI)
social share
google news

कोलकाता: ही गोष्ट जून 2025 मधील आहे जेव्हा एका फोन कॉलने दोन लोकांचे जीवन अक्षरश: उद्ध्वस्त केले. एके दिवशी केंद्र सरकारचे निवृत्त अधिकारी सुशांत आचार्य आणि त्यांच्या पत्नीला फोन आला. कॉलमध्ये, लोक स्वतःला सीबीआय आणि टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) चे अधिकारी असल्याचे सांगत या वृद्ध जोडप्याशी बोलू लागले. पण यानंतर जे घडलं ते अत्यंत भयानक होतं. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण काय.

नेमकं प्रकरण काय?

खरं तर, 17 जून रोजी सुशांत आचार्य यांच्या फोनवर एक कॉल आला. कॉल करणाऱ्याने स्वतःला ट्राय अधिकारी म्हणून ओळख करून दिली आणि म्हणाला, 'तुमचे नाव सीबीआय चौकशी करत असलेल्या एका मोठ्या आर्थिक घोटाळ्यात आले आहे. तुम्ही डिजिटल अटकेत (Digital Arrest) आहात.' या संभाषणाने सुशांत आणि त्यांची पत्नी हादरली. त्यांना काय चालले आहे ते समजू शकले नाही. फोन करणाऱ्याने त्यांना धमकी दिली की, जर त्यांनी मदत केली नाही तर त्यांची मालमत्ता जप्त केली जाईल आणि बँक खाती गोठवली जातील.

हे ही वाचा>> विकृतीचं टोक! अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, मित्रांनाही एक चान्स दे असं सांगितलं, अखेर मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

जोडप्याने त्यांचं म्हणणं ऐकलं आणि पुढील काही दिवसांत फसवणूक करणाऱ्यांनी या जोडप्याला पूर्णपणे स्वत:चं ऐकण्यास भाग पाडलं. त्यांनी सांगितले की, 'सुशांत आणि त्याची पत्नी यांना कायम व्हिडिओ कॉलवर राहावं लागेल. एवढंच नाही तर बाथरूमला जातानाही. आम्हाला बाहेर जाण्याची किंवा कोणाला भेटण्याची परवानगी नव्हती. जर आम्ही काही चूक केली तर त्यांनी आम्हाला तुरुंगात पाठवण्याची धमकी दिलेली.' फसवणूक करणाऱ्यांनी बनावट न्यायालयीन नोटीस पाठवली ज्यामध्ये म्हटले होते की, जर त्यांनी 1.55 कोटी रुपये दिले नाहीत तर ते त्यांची संपत्ती गमावून बसतील.

फसवणूक करणाऱ्यांनी सुशांत आचार्य यांना असंही सांगितलं की, त्यांच्याकडे जोडप्याचे व्हॉइस रेकॉर्डिंग आहे जे त्यांच्याविरुद्ध पुरावा म्हणून वापरले जाईल. भीतीमुळे, सुशांत आणि त्याच्या पत्नीने त्यांच्या सर्व बचत, म्युच्युअल फंड आणि मुदत ठेवी काढल्या. त्यांनी रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) द्वारे सहा हप्त्यांमध्ये 1.55 कोटी रुपये एका 'सस्पेन्स अकाउंट'मध्ये ट्रान्सफर केले जे फसवणूक करणाऱ्यांनी न्यायालयाशी जोडलेले असल्याचे सांगितले. याशिवाय, फसवणूक करणाऱ्यांनी जोडप्याला त्यांचे आधार कार्डाचे फोटोही ऑनलाइन मागवले. 

हे ही वाचा>> सातारा: गावातील तरुणासोबतच अनैतिक संबंध, प्रेमविवाह केलेल्या महिलेच्या खुनाचं हादरवून टाकणारं सत्य आलं समोर

दरम्यान, पैसे ट्रान्सफर होताच फसवणूक करणारे गायब झाले. फोन बंद झाले, पुन्हा कोणताही संपर्क झाला नाही. त्यानंतर सुशांत आणि त्यांच्या पत्नीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सुरुवातीला, भीती आणि लज्जा यामुळे ते पोलिसांशी संपर्क साधण्यास कचरले. परंतु त्यांच्या काही नातेवाईकांनी धाडस केले आणि अखेर 7 जुलै 2025 रोजी सुशांतने बेलघोरिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

बराकपूर आयुक्तालयाच्या गुप्तहेर शाखेने ताबडतोब कारवाई सुरू केली. डीसीपी अनुपम सिंह म्हणाले, 'तक्रार मिळताच आम्ही गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला. हा एक नियोजित सायबर गुन्हा आहे. ज्यामध्ये फसवणूक करणाऱ्यांनी सरकारी अधिकारी असल्याचे भासवून वृद्ध जोडप्याला लक्ष्य केले.' 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 17 जून ते 3 जुलै या कालावधीत फसवणूक करणाऱ्यांनी जोडप्याचा मानसिक छळ केला. त्यांना बनावट पद्धतीने नजरकैदेत ठेवण्यात आले आणि 24 तास व्हिडिओ देखरेखीखाली ठेवण्यात आले. 

पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आणि फसवणूक करणाऱ्यांना पकडण्यासाठी सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू केला. डीसीपी सिंह यांनी लोकांना आवाहन केले की, अशा फोन कॉल्सपासून सावध रहा, विशेषतः जे स्वतःला सरकारी अधिकारी म्हणून ओळख देतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp