Abhishek Ghosalkar: आधी सुरू केलं Facebook Live, नंतर झाडल्या धाडधाड गोळ्या..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Abhishek Ghosalkar Firing Facebook Live: शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच मॉरिस भाई याने गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

social share
google news
 

Dahisar Firing Abhishek Ghosalkar Facebook Live: मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसरमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आल्याने मुंबईत एकच खळबळ माजली आहे. धक्कादायक बाब म्हणजे Facebook Live सुरू असतानाच मारेकरी मॉरिस भाई याने गोळ्या झाडल्या आहेत. फेसबुक लाईव्ह सुरू असल्याने गोळ्या झाडल्याची सगळी दृश्य ही सोशल मीडियावरच प्रसारित झाली आहेत. (dahisar firing morris bhai shoots abhishek ghosalkar during facebook live scene of the firing was caught on camera)

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

Facbook Live सुरु केलं अन् झाडल्या गोळ्या.. 

मिळालेल्या माहितीनुसार, मारेकरी मॉरिस याने एका कार्यक्रमानिमित्त अभिषेक घोसाळकर यांना त्याच्या कार्यालयात बोलावलं होतं. जिथे सुरुवातीला मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना फेसबुक लाईव्ह सुरू करून त्यांच्या कार्यक्रमाविषयी दोन शब्द बोलण्यास सांगितलं.

हे ही वाचा>> Abhishek Ghosalkar: ठाकरेंच्या नेत्यावर बेछूट गोळीबार

मॉरिस हा अभिषेक घोसाळकरांच्या परिचयाचा असल्याने ते देखील कार्यालयात आले. परिसरातील कार्यक्रमासाठी आलेल्या अभिषेक घोसाळकर यांनी देखील अगदी हसत-खेळत फेसबुक लाईव्हवर बोलण्यास सुरुवात केली. कार्यक्रमाविषयी काही मिनिटं बोलल्यानंतर अभिषेक घोसाळकर हे खुर्चीतून जसे उठले त्याच क्षणी मॉरिसने आपल्याजवळील बंदूक काढून त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या.

हे वाचलं का?

काही क्षण नेमकं काय झालं हे अभिषेक घोसाळकर यांना कळलं नाही. मात्र, दोन गोळ्या लागताच अभिषेक यांनी मॉरिसच्या दिशेने धाव घेतली. मात्र, मॉरिसने त्यांच्यावर आणखी एक गोळी झाडली. 

यानंतर मॉरिसने स्वत:वर देखील 4 गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या गोळीबारात अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. 

गोळीबाराच्या घटनेनंतर आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

दरम्यान, या घटनेनंतर शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला. 'आताच मला ही बातमी कळली की, आमचे अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला आहे. हाच मुद्दा आहे की, हे सगळं किती दिवस सहन करायचं? यामध्ये महाराष्ट्र देखील बदनाम होत आहे. लोकांना भीती आहे आणि आता ती दिसत देखील आहे.'

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> अभिषेक घोसाळकर नेमके कोण? 

'अशामुळे उद्योजक देखील महाराष्ट्रात येणार नाही. अशी परिस्थिती या सगळ्यामुळे निर्माण झाली आहे. हा जो गुंडाराज चालू आहे.. त्यावर कारवाई झालीच पाहिजे. मुख्य गोष्ट म्हणजे गँग लीडरच घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून बसले आहेत. तिथेच मूळ महाराष्ट्राची अडचण झाली आहे. कारण या सगळ्यांना वाचवतायेत ते घटनाबाह्य मुख्यमंत्री.' अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.  

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT