WhatsApp डिपी अन् कानातल्या, 50 लाखाच्या चोरीचा असा झाला उलगडा

मुंबई तक

ADVERTISEMENT

whatsapp dp revealed the secret fo theft of 50 lakh in doctor house in bhopal madhya pradesh
whatsapp dp revealed the secret fo theft of 50 lakh in doctor house in bhopal madhya pradesh
social share
google news

Whatsapp dp revealed the secret fo theft of 50 lakh : देशभरात दररोज चोरीच्या अनेक घटना घडत असतात. या चोरीच्या घटनांमध्ये अनेक छोटे-छोटे पुरावे आढळत असतात, ज्यामुळे चोरीचा उलगडा होत असतो. जसे एखाद्या घटनेतील चोराच्या शरीरावरील टॅटू, चोराच्या चालण्याची पद्धत व सवयी यामुळे चोरीचा उलगडा होत असतो. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका व्हाट्सअ‍ॅप डिपीमुळे (whatsapp dp) 50 लाख रूपयाचे सोन्याचे दागिने आणि 5 लाख रूपये चोरी झाल्याच्या घटनेचा उलगडा झाल्याची घटना घडली आहे. ही घटना उघडकीस होताच सर्वांना धक्का बसला आहे. (whatsapp dp revealed the secret fo theft of 50 lakh in doctor house in bhopal madhya pradesh)

नेमकं प्रकरण काय?

मध्यप्रदेशच्या (madhya pradesh) भोपालमध्ये एका घरातून 50 लाख रूपयाच्या सोन्याच्या दागिन्यांची आणि 5 लाख रूपयाची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे घरात कोणताही मोठा दरोडा पडला नव्हता. याउलट घरातून एक एक करून वस्तू चोरीला जात असल्याच्या तक्रारी येत होत्या.नेमकी ही चोरी कोण करतंय याचा कुटुंबियांना सुगावा लागत नव्हता.त्यामुळे कुटुंबियांनी टीटी नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

हे ही वाचा : आधी प्रेम नंतर दिलं विष…, ‘कुंडली’च्या नादात गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडलाच संपवलं

टीटी नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी चैनसिंह रघूवंशी यांना दिलेल्या माहितीनुसार, निशात कॉलनी परीसरात राहणारे डॉक्टर भूपेंद्र श्रीवास्तव यांनी घरातून लाखो रूपयांचे दागिने आणि रोकड लंपास झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीत त्यांनी घरातून हळू हळू सोन्याची दागिने आणि रोकड लंपास होत असल्याचे म्हटले होते.तसेच घरात काम करणाऱ्या नोकरानीवर संशय असल्याने तिला 20 दिवस आधीच कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती दिली होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

व्हाट्सअ‍ॅप डिपीवर दिसले दागिने

भूपेंद्र श्रीवास्तव यांच्या पत्नीजवळ नोकरानीचा व्हाट्सअ‍ॅप नंबर होता. य़ा घटनेनंतर मालकिनीने एके दिवशी नोकरानीचा व्हाट्सअ‍ॅप डिपीवर नजर पडली. या डिपीत नोकरानीने तिच्यासाऱखेच असलेले कानातले घातले होते. हे कानातले खुपच महागडे होते. त्यामुळे इतके महागडे कानातले नोकरानीकडे आले तरी कसे ? असा प्रश्न मालकीनीला पडला होता. त्यानंतर मालकिनी तिच्याजवळ असलेले दागिने लॉकरमध्ये शोधले. मात्र तिला ते लॉकरमध्ये सापडलेच नाही. त्यामुळे घरातील चोरी नोकरानीनेच केली असावी असा संशय आणखीणच बळावला. त्यामुळे श्रीवास्तव यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.

डॉक्टर श्रीवास्तव यांच्या माहितीनंतर पोलिसांनी नोकरानीला ताब्यात घेतले होते. यावेळी पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तिने घटनेची कबूली दिली. पोलिसांनी नोकरानीच्या घराची झडती घेऊन घरातून 50 लाख रूपये किमतीचे दागिने जप्त केले यासोबत साडे पाच लाख रूपयाची रोकडही ताब्यात घेतली. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : बायकोचं ‘ते’ सत्य आलं समोर, पतीला बसला मोठा धक्का! नंतर…

    follow whatsapp

    ADVERTISEMENT