Archana Patil : ''मी राष्ट्रवादी पक्ष कशाला वाढवू?'' तीन दिवसांपूर्वी NCPत प्रवेश केलेल्या अर्चना पाटलांच मोठं विधान
NCP Candidate Archana Patil Big statement :''मी राष्ट्रवादी पक्ष कशाला वाढवू, मला काही कळत नाही, माझा नवरा भाजपचा आमदार आहे. मी महायुतीची उमेदवार, मोदी यांना 400 पार करण्यासाठी आली आहे'', असे मोठं विधान धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
NCP Candidate Archana Patil Big statement : धाराशिव, गणेश जाधव : ''मी राष्ट्रवादी पक्ष कशाला वाढवू, मला काही कळत नाही, माझा नवरा भाजपचा आमदार आहे. मी महायुतीची उमेदवार, मोदी यांना 400 पार करण्यासाठी आली आहे'', असे मोठं विधान धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केली आहे. या संदर्भातला त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवर आता अर्चना पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (dharashiv lok sabha election 2024 ncp candidate archana patil viral video maharashtra politics)
महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील बार्शीत प्रचारात गेल्या होत्या. यावेळी स्थानिक पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता. आपण राष्ट्रवादी गटाचे उमेदवार आहात, बार्शीमध्ये आपल्या गटाला प्रतिनिधित्व कमी आहे. तर आपण आपल्या गट वाढवणार का? असा सवाल केला होता. या प्रश्नावर उत्तर देताना अर्चना पाटील म्हणाल्या की, ''मी राष्ट्रवादी पक्ष कशाला वाढवू, मला काही कळत नाही, माझा नवरा भाजपचा आमदार आहे. मी महायुतीची उमेदवार, मोदी यांना 400 पार करण्यासाठी आली आहे'', असे मोठं विधान धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केली आहे. या संदर्भातला त्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : "डॉक्टर नसलो तरी, गळ्याचे, कमरेचे पट्टे काढले", शिंदेंचे ठाकरेंवर 'बाण'
दरम्यान तीन दिवसांपूर्वी अर्चना पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अर्चना पाटील यांना धाराशिवमधून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश केल्याच्या अवघ्या काही दिवसात अर्चना पाटील यांनी असे विधान केल्याने, त्या चर्चेत आल्या आहेत.
अर्चना पाटलांचे स्पष्टीकरण
दरम्यान या वक्तव्याबद्दल अर्चना पाटील यांच्याकडून अधिकचं स्पष्टीकरण आलं आहे. ‘माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून प्रसारित केलेली माझी प्रतिक्रिया तोडून-मोडून दाखवली गेली आहे’, असं अर्चना पाटील यांनी म्हटलं आहे.‘ज्या मतदारसंघात आमचे महायुतीचे सहकारी आमदार आहेत तिथे वर्चस्व वाढवण्याबाबत मला प्रश्न विचारला होता. त्यावर ‘मी महायुतीची उमेदवार असताना आणि राजाभाऊसारखा भाऊ खंबीरपणे माझ्या पाठिशी असताना तिथे माझं वर्चस्व त्या मतदारसंघात का वाढवू असं म्हणाले. पण माझ्या उत्तराला अर्धवट तोडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आणि चुकीच्या पद्धतीने ते मांडलं गेलं, असंही अर्चना पाटील यांचं स्पष्ट केले आहे. मी राष्ट्रवादीची आणि पर्यायाने महायुतीची उमेदवार आहे आणि आम्हाला पुन्हा एकदा माननीय नरेंद्र मोदींजींना पंतप्रधान करायचं आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Lok Sabha Election 2024 : बच्चू कडूंचा महायुतीवर मोठा 'प्रहार', अकोल्यात काँग्रेसला देणार पाठिंबा?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT