Eknath Shinde : "डॉक्टर नसलो तरी, गळ्याचे, कमरेचे पट्टे काढले", शिंदेंचे ठाकरेंवर 'बाण'

योगेश पांडे

ADVERTISEMENT

eknath shinde criticize udhhav thackeray lok sabha election 2024 nagapur sabha maharashtra politics
कृपाल तुमानेंना खासदारापेक्षा मोठा मान देणार आहे
social share
google news

Eknath Shinde Criticize Uddhav Thackeray : कोरोना काळात डॉक्टरांनी देवदुतासारख काम केलं. पण मी डॉक्टर नसलो तरी दीड वर्षापूर्वी मोठं ऑपरेशन केलं, काही लोकांच्या गळ्याचा आणि कमरेचा पट्टा काढला, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला आहे. तसेच दोन टर्मचे खासदार असलेल्या कृपाल तुमानेंना मी सांगितलं, निवडणूक लढवायची नाही. ते तयार झाले, आता त्यांना खासदारापेक्षा मोठा मान देणार आहे, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी तुमानेंचे पुनर्वसन करण्याची इच्छा बोलून दाखवली. (eknath shinde criticize udhhav thackeray lok sabha election 2024 nagapur sabha maharashtra politics) 

मुख्यमंत्री शिंदे नागपूरमध्ये डॉक्टर संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. कृपाल तुमाने यांना मनापासून धन्यवाद...कारण त्यांनी स्वत: उमेदवार नसून देखील ही बैठक आयोजित केली. खऱ्या अर्थाने एक आदर्श लोकप्रतिनीधी, खासदार कसा असावा? तर कृपाल तुमानेंसारखा असावा, असे कौतुक एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच दोन वेळा खासदार होऊन दिल्लीला गेलेल्या तुमाने यांना मी सांगितलं यावेळेस निवडणूक लढवायची नाही. ते तयार झाले. आता खासदारापेक्षा मोठा मान तुमानेंना देणार आहे, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. 

हे ही वाचा : Lok Sabha Election 2024 : बच्चू कडूंचा महायुतीवर मोठा 'प्रहार', अकोल्यात काँग्रेसला देणार पाठिंबा?

मी कोरोना झालेल्या डॉक्टरांना भेटण्यासाठी गेलो. तेव्हा त्यांना धीर दिला. कोरोना काळात डॉक्टरांनी देवदुताप्रमाणे काम केलं. सर्वसामन्यांना मदत करताना कधी कधी डॉक्टरांना पेसै कमी करायला सांगावे लागले. कधी कधी आम्ही आमच्या खिशात हात घातले. रुग्णालयातल्या अडचणी आम्ही कोरोळा काळात दुर केल्या, असा कोविड काळातला अनुभव शिंदे यांनी यावेळी शेअर केला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

डॉक्टर हा समाजाचा आधारस्तंभ आहे. जीवन देणारे परमेश्वराचे रूप म्हणजे डॉक्टर आहेत. कोणताही डॉक्टर पेशंट आपल्या घरी सुखरूप जावा, यासाठी प्रयत्न करत असतो. पैसे कमी करायला सांगितले तरी डॉक्टर आवडीने करतो. कारण त्यांना माहिती आहे. हे खिशातून पैसै देतील. मी कोरोना काळात खूप फिरलो. मी थोडे दिवस आरोग्यमंत्री होतो. तेव्हा दुर्गम भागात गेलो. प्रत्येक ठिकाणी भेट दिली. तिथेही डॉक्टर खूप चांगलं काम करतात, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

हे ही वाचा : शरद पवारांची साथ का सोडली? खडसेंनी सांगितला घटनाक्रम

    follow whatsapp

    ADVERTISEMENT