Exit Polls 2024 LIVE Update : मोदी येणार की सत्तांतर होणार? एक्झिट पोलचे निकाल
Lok Sabha election Exit Polls 2024 LIVE Update : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. पण, त्यापूर्वी मतदानोत्तर करण्यात आलेल्या एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. पहा कोणत्या एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाला किती मिळू शकतात जागा... वाचा लाईव्ह अपडेट्स...
ADVERTISEMENT
Exit Polls 2024 LIVE News : लोकसभा निवडणुकीचा निकाल तोंडावर आला असून, उमेदवारांसह राजकीय पक्षांच्या नेत्यांची धडधड वाढली आहे. तब्बल सात टप्प्यात लोकसभेची निवडणूक पार पडली असून, 543 जागांपैकी भाजपला किती जागा मिळणार आणि काँग्रेसची कामगिरी या निवडणुकीत कशी असेल? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. (Lok Sabha Election 2024 Exit Poll Latest Upates)
यावेळी लोकसभा निवडणुकीत एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा सामना आहे. तर अनेक राज्यात प्रादेशिक पक्ष विरुद्ध भाजप अशी लढाई आहे.
मोदींच्या नेतृत्वाखालील दहा वर्षात सत्तेत राहिलेल्या भाजपला पुन्हा जनादेश मिळणार की, विरोधकांची सरशी होणार? या निवडणुकीच्या आधी अस्तित्वात आलेल्या इंडिया आघाडीची कामगिरी कशी असणार? उत्तर प्रदेशसह उत्तरेतील राज्यांत भाजप कामगिरी कायम ठेवणार की, इंडिया आघाडीची सरशी होणार? दक्षिण भारतातील राज्यांचा निकाल कसा असेल? अशा मुद्द्यांवर चर्चा सुरू असून, एक्झिट पोलमधून याबद्दलचे अंदाज मांडले गेले आहेत... पहा सर्व अपडेट्स लाईव्ह...
लाइव्हब्लॉग बंद
- 08:28 PM • 01 Jun 2024
Exit Poll 2024 : भाजप-एनडीए, काँग्रेस-इंडियात होणार कडवी लढत
Exit Poll : पोल ट्रॅकर या निवडणूक सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने आपला एक्झिट पोल जाहीर केला आहे.
पोल ट्रॅकरच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 229 ते 268 जागा मिळतील. तर इंडिया आघाडीला 237 ते 273 जागा मिळतील. इतर पक्षांना 25 ते 39 जागा मिळतील.
- 07:41 PM • 01 Jun 2024
Bihar Exit Poll : बिहारमध्ये भाजपला जबर झटका
'इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडिया'चा बिहारमधील 40 जागांचा एक्झिट पोल समोर आला आहे.
या एक्झिट पोलनुसार भाजपला बिहारमध्ये फटका बसताना दिसत आहे. 'इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडिया'च्या एक्झिट पोलमध्ये भाजप-एनडीएला 29-33 जागा मिळतील, तर इंडिया आघाडीला 7-10 जागा मिळतील. 2019 च्या निवडणुकीत एनडीएला 39 जागा मिळल्या होत्या.
- 07:31 PM • 01 Jun 2024
Exit Poll 2024 : लोकपोल म्हणतोय, 'भाजप-एनडीए 300 पार'
निवडणुकीचे अंदाज आणि सर्वेक्षण करणाऱ्या लोकपोलने आपला एक्झिट पोल जाहीर केला आहे.
लोकपोलच्या एक्झिट पोलमध्ये भाजप-एनडीएला पुन्हा स्पष्ट बहुमत मिळेल, असे म्हटले आहे.
लोकपोल एक्झिट पोलनुसार, भाजप-एनडीएला 325 ते 335 जागा मिळतील. काँग्रेस-इंडिया आघाडीला 155 ते 165 जागा मिळतील. अपक्ष आणि छोट्या पक्षांना 48 ते 55 जागा मिळतील.
- 07:05 PM • 01 Jun 2024
Exit Poll 2024 : रिपब्लिक मॅट्रिक्सचा एक्झिट पोल काय सांगतोय?
रिपब्लिक मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 353-368, इंडिया आघाडीला 118, इतरांना 43-48 जागा मिळू शकतात.
- 06:46 PM • 01 Jun 2024
Exit Poll 2024 : तामिळनाडूत इंडिया आघाडीला 33-37 जागा, एनडीएचं काय?
'इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडिया' पहिला एक्झिट पोल समोर आला आहे. तामिळनाडूध्ये एनडीए आणि इंडिया आघाडीला किती जागा मिळणार, याबद्दलचा अंदाज मांडण्यात आला आहे.
इंडिया आघाडीला 46 टक्के मते मिळतील असा अंदाज आहे. तर एनडीए 22 टक्के मते मिळतील, असे हा एक्झिट पोल सांगतो.
'इंडिया टुडे अॅक्सिस माय इंडिया'च्या एक्झिट पोलच्या मते एनडीएला 2-4 जागा, तर 33-37 जागा मिळतील.
- 05:44 PM • 01 Jun 2024
Exit Poll 2024 : देशातील 10 सट्टा बाजाराचे काय आहेत अंदाज?
मुंबई सट्टा बाजाराचा अंदाज
भाजप -315 ते 325
काँग्रेस - 45 ते 55पालनपूर सट्टा बाजार
काँग्रेस - 112
इंडिया आघाडी - 225
भाजप - 216
एनडीए - 247करनाल सट्टा बाजार
काँग्रेस - 108
इंडिया आघाडी - 231
भाजप - 235
एनडीए - 263बोहरी सट्टा बाजार
काँग्रेस - 115
इंडिया आघाडी - 212
भाजप - 227
एनडीए - 255बेळगाव सट्टा बाजार
काँग्रेस - 120
इंडिया आघाडी - 230
भाजप - 223
एनडीए - 265कलकत्ता सट्टा बाजार
काँग्रेस - 128
इंडिया आघाडी - 228
भाजप - 218
एनडीए - 261विजयवाडा सट्टा बाजार
काँग्रेस - 121
इंडिया आघाडी - 237
भाजप - 224
एनडीए - 251
इंदूर सराफा बाजारकाँग्रेस - 94
इंडिया आघाडी - 180
भाजप - 260
एनडीए - 283अहमदाबाद चोखा बाजार
काँग्रेस - 104
इंडिया आघाडी - 193
भाजप - 241
एनडीए - 270सूरत बाजार
काँग्रेस - 96
इंडिया आघाडी - 186
भाजप - 247
एनडीए - 282कोण किती जागा जिंकणार याबद्दलचे हे अंदाज आहेत. पण, अंतिमतः कुणाला किती जागा मिळणार, हे निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
- 05:31 PM • 01 Jun 2024
Exit Poll 2024 : भाजपला किती जागा मिळणार? राजकीय विश्लेषकांचे अंदाज काय?
सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता एक्झिट पोलचे आकडे समोर येण्यास सुरूवात होईल. सर्वच एक्झिट पोल राज्यनिहाय आणि एकूण देशातील 543 लोकसभा मतदारसंघांचे आकडे जाहीर करतील. पण, हे आकडे प्रसिद्ध होण्यापूर्वी जाणून घ्या की राजकीय विश्लेषकांनी भाजपला किती जागा मिळू शकतात याबद्दल अंदाज मांडले आहेत. ते जाणून घ्या...
राजकीय अभ्यासक योगेंद्र यादव यांनी असा अंदाज मांडला आहे की, भाजपला 240 ते 260 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 85 ते 100 जागा मिळू शकतात.
रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी असा अंदाज मांडलेला आहे की, भाजपला 2019 मध्ये मिळाल्या तितक्या जागा मिळू शकतात. 2019 मध्ये भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्रशांत किशोर यांनी असंही म्हटलं आहे की, काँग्रेसला 100 पेक्षा जास्त जागा मिळाल्या, तर भाजपच्या जागा घटू शकतात. कारण, देशात सर्वाधिक मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे.
- 02:10 PM • 01 Jun 2024
Exit Poll 2024 : एक्झिट पोल कसे केले जातात?
लोकसभा निवडणुकीचे निकाल काय लागणार, यांचा अंदाज एक्झिट पोलद्वारे व्यक्त केले जातात. एक्झिट पोलचे हे अंदाज वेगवेगळ्या पद्धती आणि निकषांद्वारे ठरवले जातात.
एक्झिट पोलमध्ये सर्वेक्षण केला जातो, ज्यामध्ये मतदारांना अनेक प्रश्न विचारले जातात. मतदारांनी कोणाला मतदान केले, असे विचारले जाते. हे सर्वेक्षण मतदानाच्या दिवशीच होते. सर्वेक्षण संस्थांचे पथक मतदान केंद्राबाहेर मतदारांना प्रश्न विचारतात. मग त्याचे विश्लेषण केले जाते आणि त्याच्या आधारे निवडणूक निकालांचा अंदाज लावला जातो. भारतात अनेक एजन्सी एक्झिट पोल घेतात.
निवडणूक सर्वेक्षणाचे तीन प्रकार आहेत
1) मतदानपूर्व: या सर्वेक्षणाला प्री पोल असे इंग्रजीत म्हटले जाते. हे सर्वेक्षण निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आणि मतदान सुरू होण्यापूर्वी केले जाते.
2. एक्झिट पोल: हे सर्वेक्षण मतदानाच्या दिवशीच केले जाते. यामध्ये मतदारांच्या मनामध्ये काय आहे, त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जातो. हे मतदान केंद्राबाहेर केले जाते आणि मतदान केल्यानंतर बाहेर पडणाऱ्या लोकांना प्रश्न विचारले जातात.
3. पोस्ट पोल: हे सर्वेक्षण मतदान संपल्यानंतर केले जाते. म्हणजे १ जून रोजी मतदान संपले आहे. त्यानंतर एक-दोन दिवसांनी मतदानोत्तर सर्वेक्षण सुरू होईल. यामध्ये सहसा कोणत्या प्रकारच्या मतदाराने कोणत्या पक्षाला मतदान केले हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो.
- 02:00 PM • 01 Jun 2024
Lok Sabha Exit Poll 2024 : 2019 मध्ये एक्झिट पोलचे अंदाज काय होते?
Lok Sabha Exit Poll 2024 Latest Update : लोकसभा निवडणुकीचे निकाल काय लागतील, याबद्दलचे अंदाज एक्झिट पोलमधून समोर येईल. ४ जून रोजी कोणत्या एक्झिट पोलचे अंदाज अचूक आले, निकाल कसे लागले हे समजून घ्या.
लोकसभा निवडणूक एक्झिट पोल पोल एजन्सी भाजप+ काँग्रेस+ इतर आजतक माय अॅक्सिस 339-365 77-108 79-111 एबीपी नेल्सन 267 127 148 इंडिया टीव्ही सीएनएक्स 300 120 122 न्यूज18 इप्सोस 336 82 124 न्यूज24 चाणक्य 350 95 97 टाइम्स नाऊ-व्हीएमआर 306 132 104 न्यूज नेशन 282-290 118-126 130-138 रिपब्लिक सी व्होटर 305 124 113 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल कसा लागला?
2019 मध्ये 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते. सलग दुसऱ्या भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. भाजपने 303 जागा जिंकल्या होत्या, तर एनडीएमधील घटक पक्षांनी 51 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 52 जागा जिंकल्या होत्या, तर द्रमुकला 24 जागा मिळाल्या होत्या. तृणमूल काँग्रेसला 22, बसपा, 10, समाजवादी पार्टी 5, तेलंगणा राष्ट्र समिती 9, एमआयएम 9, भाकपा 2, माकपा 3, बिजू जनता दल 12, टीडीपी 3, आप 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 5 जागा मिळाल्या होत्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT