Arjun Khotkar : जालन्यातही शिंदेंची डोकेदुखी वाढणार, रावसाहेब दानवेंविरोधात खोतकर मैदानात
Arjun Khotkar Vs Raosaheb Danve : 'आम्ही आमच्या बाजूने 100 टक्के सर्व संपवून कामाला लागलो आहे. पण त्यांच्याच (रावसाहेब दानवे) मनाचा ठाव आम्हाला लागत नाही. आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय. पण ते मनामध्ये आडी घेऊन बसलेत, अशी टीका शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता केली.
ADVERTISEMENT
Arjun Khotkar Vs Raosaheb Danve : जालना : बारामतीतील विजय शिवतारेंचे बंड कसं बसं शमवण्यात महायुतीला बुधवारी मध्यरात्री यश आले. यानंतर शिदेंनी काहीसा सुटकेचा श्वास सोडला असेल. मात्र आता जालन्यातून शिंदेंचे नेते अर्जुन खोतकर यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. 'आम्ही आमच्या बाजूने 100 टक्के सर्व संपवून कामाला लागलो आहे. पण त्यांच्याच (रावसाहेब दानवे) मनाचा ठाव आम्हाला लागत नाही. आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय. पण ते मनामध्ये आडी घेऊन बसलेत, अशी टीका शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता केली. त्यामुळे आता जालन्यात शिंदेंची डोकदुखी वाढण्याची शक्यता आहे. (shiv sena eknath shinde 8 seat candidate deaclare hemant godse chhagan bhujbal nashik lok sabha constituncy)
ADVERTISEMENT
अर्जुन खोतकर यांनी मुंबई तकशी बोलताना सांगितले की, भाजपने त्यांच्या खासदारांच्या उमेदवाऱ्या घोषित केल्या. त्यांना त्यांचे उमेदवार घोषित करण्याचा अधिकार आहे. मग आम्हाला आमचे उमेदवार घोषित करण्याचा अधिकार का नाही ? असा सवाल करत मित्रांनी मित्रा सारखं वागलं पाहिजे, असा टोला खोतकर यांनी भाजपला लगावलाय. तसेच तुम्ही का आमच्या जागा मागायला लागले? का आमच्यात लुडबूड करायला लागलेत? आम्ही तुमची जागा मागितली कुठली? संभाजी नगर, हिंगोली, धाराशिव का मागता? जिथे आमचे खासदार आहेत त्या जागा का मागतात? असा संतप्त सवाल देखील खोतकरांनी उपस्थित केला. आमच्या सर्व जागा तुम्ही मागतात त्यावर दावा करताय जर असा घोळ घातला जात असेल तर काय म्हणावं असं खोतकर म्हणाले आहेत.
हे ही वाचा : Shivsena: अखेर शिंदेंकडून उमेदवार जाहीर, पाहा पहिली यादी
तुमच्या भरवशावर, एकनाथ शिंदे यांच्या भरवशावर विश्वास टाकून ही मंडळी आलेली आहेत. त्यामुळे मित्रांनी मित्रा सारखा वागावं ही अपेक्षा आहे. मित्राने मित्राची फसवणूक करू नये. यामुळे सर्वसामान्यांमध्ये युतीबद्दलच वातावरण खराब होत असल्याचे खोतकर यांनी चिंता व्यक्त केली. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचंय हा आमचा प्रयत्न असेल ते आमचं स्वप्न आहे म्हणून आम्ही उमेदवार कोण हे बघणार नाही असं म्हणत मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही जीव तोडून मेहनत करणार असल्याच खोतकर यांनी स्पष्ट केले आहे.
हे वाचलं का?
दरम्यान लोकसभा निवडणुकीत जरांगेंच्या नेतृत्वात मराठा समाजही उमेदवार उभे करणार आहे. यावर बोलताना खोतकर म्हणाले की, मराठा उमेदवार उभे राहिल्याचा थोडाफार परिणाम होईल. मराठा समाज जरांगे यांच्या बाजूने आहे हे नाकारता येत नाही. आमची कोणत्याच गावात जायची हिंमत होत नाही.संघर्ष होऊ शकतो. लोक चांगल्या नजरेने बघत नाही असं म्हणत खोतकर यांनी मराठा आंदोलकांची भीती बोलून दाखवली आहे.
हे ही वाचा : गोविंदा शिवसेनेत! शिंदेंना 'या' जागेसाठी उमेदवार सापडला?
अर्जुन खोतकर यांनी जालना लोकसभेवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, रावसाहेब दानवेंच्या मनामध्ये अजूनही आढी असून त्यांच्या मनाचा ठाव आम्हाला लागत नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय. मागच्या लोकसभेला दानवे आणि खोतकर यांचे राजकीय शस्त्रुत्व मिटल्याचं बोललं जात होतं. मात्र खोतकरांच्या वक्तव्यानंतर दानवे खोतकर अजूनही जुळत नाहीये. यंदाही महायुती असून दानवे उमेदवार आहेत. त्यामुळं आम्ही आमच्यापरिने शंभर टक्के कामाला लागलो. मात्र दानवेंच्या मनामध्ये अजूनही आढी असून त्यांच्या मनाचा ठाव आम्हाला कळत नाही. दानवेंकडून योग्य तो सन्मान दिला जात नाही असं खोतकर यांनी म्हणत नाराजी व्यक्त केलीये.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT