लाइव्ह

Lok Sabha Election Live : धैर्यशील मोहिते पाटलांनी फुंकली 'तुतारी', काय बोलले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार.
धैर्यशील मोहिते पाटील यांनी जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
social share
google news

Marathi News LIve Updates : भारतीय जनता पक्ष आज 14 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. भाजप याला संकल्प पत्र असेही म्हणत आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत दिल्लीतील भाजप कार्यालयात आज सकाळी 9 वाजता भाजप आपला जाहीरनामा प्रसिद्ध करू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या जाहीरनाम्याची थीम 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याच्या 'मोदींच्या गॅरन्टीवर'वर आधारित असू शकते अशी चर्चा आहे.

 

 

लाइव्हब्लॉग बंद

  • 08:18 PM • 14 Apr 2024

    Lok Sabha Election Live : धैर्यशील मोहिते पाटलांनी फुंकली 'तुतारी', काय बोलले?

    अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर जयंत पाटील यांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश झाल्यानंतर जयंत पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी घोषित केली. धैर्यशील मोहिते पाटील पक्षप्रवेशावेळी काय बोलले... संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा.

     

  • 05:53 PM • 14 Apr 2024

    Lok Sabha 2024 Live : उद्धव ठाकरेंच्या पुत्रमोहाने शिवसेना फोडली; अमित शाहांचा पलटवार

    "मी आता उद्धव ठाकरेंना पाहतोय. ते म्हणताहेत की, भाजपने माझा पक्ष फोडला. शरद पवारही म्हणताहेत की, भाजपने माझा पक्ष फोडला. मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर हे स्पष्ट करायला आलोय की, आम्ही ना शिवसेना फोडली, ना राष्ट्रवादी काँग्रेस. उद्धवजींच्या पुत्रमोहाने शिवसेना फोडली. आणि पवारांच्या कन्यामोहाने राष्ट्रवादी काँग्रेस फोडली."

    "आणि बघा. इथलेच नेते (नाना पटोले) महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष बनले. काँग्रेसचे काय हाल झाले आहेत. अर्ध्या शिवसेनेने आणि अर्ध्या राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण काँग्रेसला अर्धे करण्याचे काम केले आहे. मग हे तीन अर्धे पक्ष महाराष्ट्राचं भलं करू शकतात का? महाराष्ट्राचं भलं फक्त भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबत नरेंद्र मोदीच करू शकतात, दुसरं कुणीही करू शकत नाही", असे अमित शाह म्हणाले.

     

  • 05:38 PM • 14 Apr 2024

    Madha Lok Sabha : धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश

    धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. पहा कोण काय बोललं? 

     

  • 05:29 PM • 14 Apr 2024

    Lok Sabha Election 2024 : मोदींना व्होट आणि काँग्रेसला शॉक द्या -फडणवीस

    कमळाचं बटण दाबा. कमळाचं बटण दाबलं की, व्होट मोदीजींना मिळेल आणि शॉक काँग्रेसला मिळेल. मोदीजींना व्होट देऊन काँग्रेसला शॉक द्या, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेला उपस्थित लोकांना केले.

  • ADVERTISEMENT

  • 03:43 PM • 14 Apr 2024

    '4 जूनपासून उपोषणाला बसणार', जरांगे-पाटलांचा सरकारला इशारा

    जरांगे-पाटलांचा इशारा

    "जर येत्या काही महिन्यांत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही तर मी पुन्हा एकदा 4 जूनपासून उपोषणाला बसणार आहे. राज्य सरकारकडून आमची दिशाभूल करण्यात आली आहे. महायुतीने आम्हाला मराठा आरक्षण दिलेले नाही. त्यांची सत्ता असतानाही त्यांनी मराठा आरक्षणासाठी काहीही केले नाही." असंही जरांगे-पाटील म्हणाले. 

  • 02:05 PM • 14 Apr 2024

    "अगतिक बाबा बारामतीच्या लेकीचे", शरद पवारांवर शेलारांचे 'वाक्'बाण

    'सुनेचा हक्क सासऱ्यांनी नाकारला
    अनेकांच्या जाती काढून झाल्यावर
    घरातच भांडणाचा विषय काढला?
    काय बोलावे ? प्रश्न आता तमाम पुरोगाम्यांना पडला 

    वाद लावून झाले..
    इतिहास, भूगोल, पगडी आणि टोपीचे..
    महाराष्ट्राने पाहिले आज
    अगतिक बाबा बारामतीच्या लेकीचे!' अशा शब्दात अॅड. आशिष शेलार यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
     

  • ADVERTISEMENT

  • 01:55 PM • 14 Apr 2024

    'गृह खात्याचं अपयश..'; सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

    बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर आज (14 एप्रिल) पहाटे गोळीबार झाला. "हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण सलमान खान ज्या भागात राहतो तो भाग खूप प्रसिद्ध आहे. तिथे सकाळी लोक मॉर्निंग वॉकला जातात तसंच भाजीवाले-दुधवाले तिथे येतात, त्यांच्या सुरक्षेचं काय? हे गृह खात्याचे अपयश आहे. सलमानच्या कुटुंबावर दबाव आहे."असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

  • 01:53 PM • 14 Apr 2024

    एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी फोनवरुन संवाद साधला

    मुंबईतील वांद्रे येथील सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी फोनवरुन संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खानची सुरक्षा वाढवण्याची सूचना केली.

  • 01:46 PM • 14 Apr 2024

    "मोदी-पुतिन यांच्यात फरक नाही"- शरद पवार

    धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानिमित्त शरद पवार अकलूजमध्ये आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पवारांनी, मोदी आणि पुतिन यांच्यात काहीच फरक नाही अशी टीका केली.

  • 12:31 PM • 14 Apr 2024

    माढ्यातील गणित बदललं; पवार-मोहिते पाटील एकत्र

    माढ्यातील राजकीय गणितं ही झपाट्याने बदलली आहेत. धैर्यशील मोहिते पाटील आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील घरी जाऊन भेट घेतली. या भेटीने माढा, सोलापूर, बारामती लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणितं बदलली आहे. महत्त्वाचं म्हणजे या शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह सुशीलकुमार शिंदे हेही होते. मात्र, या नव्या समीकरणांनी भाजपच्या चिंतेत भर घातली आहे. 

     

     

     

  • 12:10 PM • 14 Apr 2024

    Salman Khan Firing News : मुख्यमंत्री शिंदेंचा सलमान खानला फोन

    14 एप्रिल रोजी पहाटे अभिनेता सलमान खान याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दिशेने पाच गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील चार गोळ्या सलमान खानच्या घराच्या दिशेने तर एक गोळी जमिनीवर झाडली गेली, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

    दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता सलमान खानला कॉल केला. सुरक्षेसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी सलमान खानला आश्वासित केले आहे. शिंदे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनाही फोन केला आणि सलमान खानच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्याची सूचना केली. 

  • 12:02 PM • 14 Apr 2024

    BJP manifesto 2024 : पुन्हा सरकार आल्यावर भाजप काय करणार?

    - मुद्रा योजनेतील कर्जांची मर्यादा 10 लाखावरुन 20 लाख.
    - लखपती दीदी योजनेचा विस्तार करून 3 कोटी महिलांना लाभ देणार.
    - आयुष्मान भारत योजना 70 वर्षे वयावरील नागरिकाना लागू करणार.
    - पीएम आवास योजनेत नवीन 3 कोटी घरे बनवणार.
    - एकलव्य शाळांची संख्या वाढवणार.
    - तमिळ भाषा जगातील सर्वात प्राचीन भाषा, तिचा विस्तार करणार
    - महिलाना अनेक क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण देणार.
    - पर्यटन क्षेत्राला बळ देणार. रोजगार वाढवणार. 
    - पर्यावरण पूरक पर्यटनामध्ये आदिवासींना संधी उपलब्ध करून देणार.
    - नवीन रोजगार संधी उपलब्ध करुन देणार.
    - वंदे भारत ट्रेनमध्ये स्लीपर सोय उपलब्ध करून देणार.
    - बुलेट ट्रेनचा विस्तार करणार. उत्तर, दक्षिण, पुर्व भारतात विस्तार करण्याबद्दल अभ्यास करणार.
    - देशाला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर करणार.
    - सूर्य घर योजनेचा विकास
    - एक देश एक निवडणूक अंमलबजावणी करणार
    - समान नागरी कायदा लागू करणार.
    - भ्रष्टाचार विरोधी मोहीम सुरूच ठेवणार.

     

     

  • 10:44 AM • 14 Apr 2024

    घरोघरी गॅस पाईपलाईनची सुविधा

    आता घरोघरी गॅस पाईपलाईन पुरविण्याचे उद्दिष्ट भाजपने समोर ठेवले आहे. देशातील प्रत्येक घराला पाईपलाईनद्वारे गॅस पुरविण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

     

  • 10:43 AM • 14 Apr 2024

    वन नेशन-वन इलेक्शन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन नेशन-वन इलेक्शनचा पुन्हा हुंकार भरला. बहुमतातील सरकार कठोर निर्णय घेऊ शकते, याकडे त्यांनी जनतेचे लक्ष वेधले.

follow whatsapp

ADVERTISEMENT