लाइव्ह

Lok Sabha Elections 2024 Live : अजित पवारांकडून शिवाजी आढळराव पाटलांची उमेदवारी जाहीर

मुंबई तक

ADVERTISEMENT

shivaji adhlarao patil, ajit pawar
अजित पवारांनी जाहीर केली शिवाजी आढळराव पाटलांना उमेदवारी
social share
google news

Lok Sabha Elections 2024 Maharashtra live updates : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी (२७ मार्च) शेवटचा दिवस असून, यानिमित्ताने शक्तप्रदर्शन बघायला मिळणार आहे. याबद्दलचे अपडेट्स वाचा...

ADVERTISEMENT

 

 

ADVERTISEMENT

  • 07:34 PM • 26 Mar 2024

    अजित पवारांनी जाहीर केली शिवाजी आढळराव पाटलांना उमेदवारी

    गेल्या काही दिवसांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या शिवाजी आढळराव पाटील यांनी अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर आता अजित पवार यांनी शिवाजी आढळराव पाटलांना उमेदवारी जाहीर केली आहे.त्यामुळे शिरूर लोकसभा मतदार संघात शिवाजी आढळराव पाटील विरूद्ध अमोल कोल्हे अशी लढत होणार आहे. 
     

  • 02:55 PM • 26 Mar 2024

    अजित पवारांच्या तीन उमेदवारांची नावे निश्चित, फक्त घोषणेची औपचारिकता!

    अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन उमेदवारांची नावे निश्चित झाली आहे. त्यापैकी एका उमेदवाराचे नाव अजित पवार यांनी घोषित केले आहे. सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर करण्याच आली आहे. तर बारामतीतून सुनेत्रा पवार असणार आहेत. शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवार असणार आहेत. अजित पवारांनीच याला दुजोरा दिला आहे. महायुतीचे जागावाटपाची घोषणा २८ मार्च रोजी करण्यात येणार आहे, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.

  • 02:45 PM • 26 Mar 2024

    Lok Sabha Elections 2024 : अजित पवारांनी जाहीर केला पहिला उमेदवार

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. मुंबई झालेल्या बैठकीनंतर अजित पवारांनी ही घोषणा केली. रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणा करतो, असे पवार म्हणाले.

  • 11:45 AM • 26 Mar 2024

    Lok Sabha Elections 2024 Updates : नाशिकमधून भुजबळ निवडणुकीच्या मैदानात?

    छगन भुजबळ लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे. याबद्दल भुजबळ म्हणाले, "माझं नाव माध्यमांनीच चर्चेत आणलं आहे. अजून राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदे गट आणि भाजपची चर्चा सुरू आहे. बऱ्याच गोष्टींवर त्यांचं एकमत झालेलं आहे. ते पुन्हा एकदा तपासून कुठली जागा कुणाला, याचा ते निर्णय घेतील."

    "आता नाशिकच्या बाबतीसुद्धा अनेकजण म्हणताहेत की नाशिकची जागा आम्हाला पाहिजे. काही लोक तिकडे गेले सुद्धा उमेदवारीसाठी. काय नाशिकची परिस्थिती आहे. ती लढवली तर राष्ट्रवादीची काय परिस्थिती असेल. या सगळ्याचा घोषवारा भाजप घेत आहे. शिंदे गट आणि राष्ट्रवादीही घोषणावारा घेत आहे. नंतर तिघेही एकत्र बसून ठरवतील", अशी माहिती भुजबळ यांनी दिली. 

    पुढे ते म्हणाले की, "मग जो कुणी उमेदवार ठरेल. मग तो भाजपचा ठरो, शिंदे सेनेचा ठरो की, अजित पवार राष्ट्रवादीचा ठरो... त्याच्या पाठीमागे तिन्ही पक्ष मजबुतीने उभे राहतील आणि निवडणू आणण्याचा प्रयत्न करतील."

  • ADVERTISEMENT

  • 11:19 AM • 26 Mar 2024

    मनसेच्या मुंबईतील नेत्यांची बुधवारी दहा वाजता महत्त्वाची बैठक

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईच्या नेत्यांनी उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे. बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्त्वात सकाळी दहा वाजता ही बैठक होणार आहे.

  • 11:18 AM • 26 Mar 2024

    वंचित बहुजन आघाडीची बुधवारी महत्त्वाची पत्रकार परिषद

    वंचित बहुजन आघाडीची उद्या महत्त्त्वाची पत्रकार परिषद होणर आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

  • ADVERTISEMENT

  • 11:16 AM • 26 Mar 2024

    आमदार राम सातपुते यांचा आज कृतज्ञता मेळावा

    माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील निवासस्थानी आज सायंकाळी 5 वाजता कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार राम सातपुते लोकप्रतिनिधी व जनता यांचा कृतज्ञता मेळावा घेणार आहेत. आमदार राम सातपुते यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने माळशिरस विधानसभा मतदारसंघात कृतज्ञता मेळावा घेत आहेत. आमदार सातपुते यांनी माळशिरस मतदार संघात अनेकवेळा जनता दरबार घेतलेला आहे. मात्र आज कृतज्ञता मेळावा घेतल्याने सगळ्याचे लक्ष लागले आहे.

  • 11:11 AM • 26 Mar 2024

    अतिउत्साह नडला! धुलीवंदनाला 5 मुलं समुद्रात बुडाली, एकाचा मृत्यू

    धुलीवंदन साजरे करताना मुंबईकरांचा उत्साह अगदी गगनात मावेनासा होता. पण, हा अतिउत्साह 5 मुलांच्या जीवावर बेतला आहे. धुलीवंदन साजरा करणारे पाच अल्पवयीन मुले सोमवारी सायंकाळी माहिमजवळील समुद्रात बुडाले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर दुसरा बेपत्ता आहे. पाण्यात बुडाल्यापैकी चार जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी समद्रातून बाहेर काढले. यामध्ये हर्ष किंजले या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर यश कागडा या मुलाचा अग्निशमन विभागाकडून शोध सुरू आहे. दोन मुलांवर हिंदुजा रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

  • 09:27 AM • 26 Mar 2024

    माजी आमदार आडम यांची 'मविआ'ला ऑफर, पण मागणी काय?

    सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदेंना उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याविरोधात भाजपने विद्यमान आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. अशात माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी महाविकास आघाडीला ऑफर दिली आहे. 

    माजी आमदार आडम म्हणाले, "आम्ही इंडिया आघाडीत आहोत. आमची मागणी आहे की, दिंडोरी लोकसभा माकपसाठी द्यायला हवा, त्यावर अजून निर्णय झालेला नाही. आमचे कितीही मतभेद असले तरी आम्ही प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी तन, मन आणि धन लावून प्रयत्न करू. फक्त त्यानी मध्य विधानसभा मतदारसंघ आम्हाला सोडला पाहिजे", अशी मागणी त्यांनी केली. 

    पुढे ते म्हणाले की, "सोलापूर लोकसभा मतदारसंघातील जवळपास दीड लाख मतदार हे माकपचे सदस्य आहेत. आज देशाचे संविधान धोक्यात आहे, इलेक्ट्रोरल बॉण्डचा इतका मोठा घोटाळा झाला. त्यामुळे आमचा विरोधक हा भाजप आहे, त्यामुळे सर्व मतभेद विसरून सोलापुरात काँग्रेसला साथ देऊ", अशी भूमिका आडम यांनी मांडली आहे. 

  • 09:18 AM • 26 Mar 2024

    Lok Sabha election 2024 live Updates : ठाकरे-मुनगंटीवार भरणार अर्ज

    नागपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुसरीकडे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून सुधीर मुनगंटीवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी दोघेही रोड शो च्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे. 

follow whatsapp

ADVERTISEMENT