Maharashtra : विधानसभेत महायुतीला बसणार जबर झटका, मविआचं काय?
Maharashtra Assembly Election Poll 2024 : महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी किंवा महायुतीला 155 जागांची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे या पोलनुसार लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महायुतीला धक्का बसण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
Maharashtra Assembly Election Poll 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.यानुसार सर्वच पक्षांनी बैठकाही घ्यायला सुरुवात केली आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) पारड्यात जनतेने भरभरून मतं टाकली होती. तर महायुतीच्या (Mahayuti) पारड्यात खुपच कमी जागा आल्या होत्या. त्यामुळे असाच निकाल विधानसभा निवडणुकीत लागेल का? असा प्रश्न राजकीय विश्लेषकांना पडला आहे. त्यात आता विधानसभा निवडणुकीवर एक धक्कादायक पोल समोर आला आहे. या पोलचा कौल नेमका कुणाच्या बाजुने लागलाय? हे जाणून घेऊयात. (maharashtra assembly election 2024 tv9 poll maha vikas aghadi vs mahayuti maharashtra politics lok sabha result 2024)
ADVERTISEMENT
विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच टीव्ही 9 मराठीने एक पोल केला आहे.या पोलनुसार महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला तब्बल 158 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला अवघ्या 127 जागांवर समाधान मानावे लागण्याचा अंदाज आहे. तर तीन जागा इतर पक्षांना मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी किंवा महायुतीला 155 जागांची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे या पोलनुसार लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महायुतीला धक्का बसण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : ठाकरेंचं चंद्रकांत पाटलांकडून कौतुक, भाजप-शिवसेनेत दिलजमाई होणार?
दरम्यान लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हा 13 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या होत्या. अशाप्रकारे महाविकास आघाडी 30 जागांवर जिंकली होती.
हे वाचलं का?
महायुतीच्या निकालाबद्दल बोलायचं झालं तर भापजने 9 जागा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली होती. त्यामुळे महायुतीला अवघ्या 17 जागाच जिंकता आल्या होत्या. दरम्यान आता लोकसभेप्रमाणेच आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागतो का? हे आता निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
हे ही वाचा : ठाकरेंनी पटोलेंचा फोन टाळला? महाविकास आघाडीत काय घडतंय?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT