Amol Kirtikar : अवघ्या 48 मतांनी अमोल किर्तीकर कसे पडले? मतमोजणीच्या दिवशी काय घडलं?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

mumbai north west election 2024 ravindra waiker how amol kirtikar fell just 48 votes lok sabha result 2024
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या आहेत.
social share
google news

Mumbai North West, Amol kirtikar : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या आहेत. तर मुंबईतील सहा जागांपैकी 3 जागा उद्धव ठाकरेंनी जिंकल्या तर काँग्रेस, शिंदे गट आणि भाजपला प्रत्येकी एक जागा मिळाली. या मतदार संघांपैकी मुंबई उत्तर पश्चिम या जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निसटता पराभव झाला. या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये अटीतटीची लढत झाली होती. अवघ्या एका मतावर देखील लीड पोहोचली होती. मात्र शेवटच्या क्षणी 48 मतांनी अमोल किर्तीकरांचा पराभव झाला होता. त्यामुळे शेवटच्या क्षणी नेमकं काय घडलेलं, आणि अमोल किर्तीकरांचा पराभव कसा झाला? हे जाणून घेऊयात.  (mumbai north west election 2024 ravindra waiker how amol kirtikar fell just 48 votes lok sabha result 2024) 

ADVERTISEMENT

मुंबई उत्तर पश्चिम या मतदार संघातून ठाकरेंनी अमोल किर्तीकर यांना उमेदवारी दिली होती. तर ठाकरेंना जय महाराष्ट्र करून निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या रविंद्र वायकरांना शिंदेंनी उमेदवारी दिली होती. या निवडणूकीत वडील गजानन किर्तीकर शिंदे गटात गेल्यानंतर देखील अमोल किर्तीकर ठाकरेंसोबत राहिले होते. त्याचसोबत त्यांच्यामागे चौकशीचा ससेमीरा देखील लावण्यात आला होता. मात्र तरी देखील ते डगमगले नाहीत आणि ठाकरेंसोबत कायम राहिले.यामुळेच मतदारांचं समर्थन त्यांना मिळल्याची चर्चा होती.

मतमोजणीच्या दिवशी काय घडलं?

मतमोजणीच्या सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये अमोल किर्तीकर आघाडीवर होते. प्रत्येक फेऱ्यानंतर त्याचं लीड वाढतं होतं. त्यानंतर मतमोजणीच्या फेऱ्या जशा जशा वाढत गेल्या तसतशी चुरस देखील वाढायला सुरुवात झाली. 24व्या फेरीअखेर अमोल किर्तीकरांनी 2 हजार 424 मतांचं लीड घेतलं. या लीडनंतर मतदानाच्या दोन फेऱ्या बाकी असतानाच कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरूवात केली. अमोल किर्तीकर जिंकतील अशा बातम्याही येऊ लागल्या.

हे वाचलं का?

हे ही वाचा: Eknath Shinde : मोदींच्या सरकारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' खासदार होणार मंत्री?

 पण 25 व्या फेरीत अमोल किर्तीकरांनी 1 हजार 543 पर्यंत पोहोचलं. त्यानंतर 26 व्या फेरीअखेर 681 च लीड घेतलं. शेवटच्या टप्प्यात झालं असं की अमोल किर्तीकर यांना 4 लाख 51 हजार 95 मतं पडली तर रवींद्र वायकर यांना 4 लाख 51 हजार 94 मतं पडली.  त्यामुळे अवघ्या 1 मताचं लीड किर्तीकर यांनी घेतलं. त्यानंतर पुन्हा फेर मतमोजणीची मागणी केली. 

किर्तीकरांनी एका मताचं लीड घेतल्यानंतर पुन्हा बॅलेट मतांची मोजणी करण्याची मागणी झाली. त्यानुसार पुन्हा 3 हजार 133 मतांची पुन्हा मोजणी झाली. ज्यामध्ये अमोल किर्तीकरांना 1 हजार 501 तर रविंद्र वायकरांना 1 हजार 550 बॅलेट मतं मिळाली होती. यामध्ये वायकरांना 
49 मतं जास्त असल्याने त्यांचं लीड वाढलं होतं. त्यात किर्तीकरांची एका मताची आघाडी असल्यामुळे वायकर यांचं लीड 48 मतांच झालं. आणि शेवटी अमोल किर्तीकरांना 4 लाख 52 हजार 596 आणि रविंद्र वायकरांना 4 लाख 52 हजार 644 मतं मिळाली. ज्यामुळे 48 मतांनी अमोल किर्तीकरांचा पराभव झाला. दरम्यान या निकालावर उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेत कोर्टात जाण्याची भूमिका घेतली होती. तसेच निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली होती. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा: Lok Sabha : मोदींवर प्रचंड मोठा आरोप, राहुल गांधीनी केली जेपीसी चौकशीची मागणी

या घटनेवर रविंद्र वायकर बीबीसीवर बोलले की, 'मी टीव्हीवरच निकाल पाहतं होतं आणि  त्यावेळी 2 हजार 200 मतांनी किर्तीकर विजय झाल्याच पाहिलं. एक लाख मतं मोजायच्या आहेत आणि दोन फेऱ्या मोजायच्या आहेत. आणि तुम्ही विजयी कसं ठरवतात? मतमोजणीच सुरु असल्याने फेर मतमोजणीची मागणीच केली नाही,असे वायकर यांनी सांगितले. यावेळी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर बोलताना वायकरांनी हरलेला माणूस असचं करतो म्हणत टोला लागावला. तसेच ते आव्हान देऊ शकतात. लोकशाही आहे, असे देखील वायकरांनी म्हटलं. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT