बॉलिवूड अभिनेता शरमन जोशीचे वडील आणि जेष्ठ अभिनेते अरविंद जोशी यांचं निधन झालं आहे. मुंबईतील नानावटी रूग्णालयात त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. अरविंद जोशी यांनी अनेक गुजराती नाटकांमध्ये काम केलं असून दिग्दर्शनही केलेलं आहे.
अरविंद जोशी यांनी गुजराती नाटकांव्यतिरीक्त बॉलिवूडच्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. बॉलिवूडमधील शोले, इत्तेफाक तसंच अपमान की आग या सिनेमांमध्ये काम केलं आहे.
अरविंद जोशी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा शरमन जोशी आणि मुलगी मानसी जोशी रॉय असा परिवार आहे.