Mumbai Tak /बातम्या / अभिनेत्री भाग्यश्री मोटेवर महिन्याभरात दोन मोठे आघात!
बातम्या मनोरंजन

अभिनेत्री भाग्यश्री मोटेवर महिन्याभरात दोन मोठे आघात!

Bhagyashree Mote Sister and her husband Death: पुणे: मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Actress Bhagyashree Mote) हिची मोठी बहीण मधू मार्कंडेय (Madhu Markandeya) हिचा काल (13 मार्च) मृत्यू झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं. पुण्यातील (Pune) वाकड परिसरात राहणाऱ्या मधू हिला अचानक चक्कर आली आणि ती खाली कोसळली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टारांनी घोषित केलं. दरम्यान, या घटनेने अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिला मोठा धक्का बसला आहे. अवघ्या 15 दिवसांच्या अंतराने भाग्यश्रीवर सलग दुसरा आघात झाला आहे. ज्यामध्ये तिला आपल्या अगदी जवळच्या दोन जणांना गमवावं लागलं आहे. (actress bhagyashree mote suffered two major shocks in a month fans were also shocked)

भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा मृत्यू

भाग्यश्रीची मोठी बहीण मधू हिचा अचानक झालेल्या मृत्यूने भाग्यश्री पार हादरून गेली आहे. कारण अगदी अनपेक्षिरित्या ही बातमी तिच्या कानावर आदळली. खरं तर मधू ही वाकड परिसरात केक बनवण्याचा व्यवसाय करायची. ज्यामध्ये तिला तिची मैत्रीण मदत करायची. आपल्या व्यवसायासाठी मधूला एक फ्लॅट भाड्याने हवा होता. त्यामुळे रविवारी मधू तिच्या मैत्रिणीसह वाकड परिसरात फिरत होती.

दरम्यान, रूम बघून झाल्यानंतर अचानक मधूला चक्कर आली आणि तिची दातखिळी बसली. त्यामुळे तिच्या सोबत असणाऱ्या मैत्रिणीने तिला ताबडतोब नजीकच्या खासगी रुग्णालयात नेलं. पण तिथे उपचार होऊ न शकल्याने मधूला महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी मधूला तपासल्यानंतर ती मृत असल्याचं घोषित केलं.

अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा मृत्यूने पुणे हादरलं, चेहऱ्यावर गंभीर जखमा

मधूच्या मृत्यूनंतर भाग्यश्रीने सोशल मीडियावर बहिणीसोबतचे फोटो शेअर करून तिच्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी एक फोटो शेअर करून भाग्यश्रीने कॅप्शनमध्ये असं म्हटलं की, ‘माझ्या प्रिय बहिणीने या जगाचा निरोप घेतला! माझी आई, बहीण, मित्र, विश्वासू आणि आणखी काय-काय होतीस तू माझ्यासाठी? तू माझा पाया होतीस. माझ्या संपूर्ण अस्तित्वाचा केंद्रबिंदू होती. तुझ्याशिवाय मी पूर्णपणे हरवले आहे. तुझ्याशिवाय या आयुष्याचं काय करू? तू मला ते कधीच शिकवलं नाहीस. मृत्यू अटळ आहे पण मी तुला जाऊ देणार नाही. कधीच नाही.. कधीच नाही’ असं भाग्यश्रीने कॅप्शनमध्ये लिहलं आहे.

‘हॅप्पी बर्थडे माय लव्ह’; भाग्यश्री मोटेची बॉयफ्रेंडसाठी खास पोस्ट

दरम्यान, सख्ख्या बहिणीला गमावण्याआधी भाग्यश्रीवर अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी असाच आघात झाला होता. भाग्यश्रीची बहिण मधू हिचा पती संकेत मार्कंडेय याचा मृत्यू झाला होता. ज्यावेळी भाग्यश्रीने सोशल मीडियावर संकेतचा फोटो शेअर करून त्याला श्रद्धांजली अर्पण केली होती.

‘हे लिहिताना माझ्या मनाला वेदना होत आहेत.. आम्ही मोठे होत असताना तू आमच्या आयुष्यातील एक अत्यावश्यक भाग होतास. तुझी खूप आठवण येईल. तुझ्या आत्म्यास शांती मिळो.. दाजी!’

दरम्यान, हे दु:ख पचवत असतानाच दुसरीकडे अवघ्या 15 दिवसातच काळाने भाग्यश्रीवर बहिणीच्या मृत्यूने आणखी एक मोठा आघात केला.

भाग्यश्री मोटेच्या जीन्स अन् कट टॉपमधील हॉट पोझ

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांचाच गॅगरेप पिडितेवर बलात्कार Uttar Pradesh: महिलेच्या हत्येचे गूढ 9 वर्षांनंतर एका पोपटाने उलगडलं… Shraddha Arya: बॉलिवूड अभिनेत्रीने पतीच्या वाढदिवसाला घातली बिकिनी, नेटकरी म्हणाले… प्रसुतीनंतर अभिनेत्रीचं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन, घटवलं 10 किलो वजन! Amrita Ahuja: हिंडेनबर्गच्या अहवालात भारतीय वंशीय महिलेचं नाव, गंभीर आरोप 38 कोटींचा बेवारस चेक परत केला अन् जे मिळालं त्याने पायाखालची जमीन सरकली Twitter Blue tick: ब्लू टिकसाठी आता पैसे भरा, महिन्याला किती रुपये द्यावे लागणार? H3N2 Virus पासून बचावासाठी ‘या’ घरगुती गोष्टींचा आहारात करा वापर… MS Dhoni: आयपीएलमध्ये धोनी करणार गोलंदाजी? नेटमधील फोटो बघून चाहते बुचकळ्यात Anushka Sharma : ग्लॅमरस ड्रेस, पायात घुंगरांचं पैजण अनुष्काची यूनिक स्टाईल चाहत्यांना भावली वय अवघं 48…काजोल देवगणच्या बोल्ड लूकची चर्चा ‘भाबी जी घर पर हैं’ हा अश्लील शो आहे का? अंगूरी भाभी म्हणाली, ‘मी कधीही…’ हिंदू राष्ट्राचे स्वप्न महाराष्ट्रातूनच पूर्ण होईल: धीरेंद्र शास्त्री या 6 गोष्टी रोज करा.. आयुष्यभर आनंदाची खात्री Salman Khan: कोट्यवधींमध्ये फीस घेतो, तरीही राहतो 1BHK फ्लॅटमध्ये, घरात काय काय? ईशा अंबानीचा रॉयल लूक पाहतच राहाल… मोबाइल दुकानदारावर जडला जीव; पत्नीने रचला कट, पतीची निर्घृण हत्या! 4 फूट उंचीचा ‘तो’ रेसलर, WWE च्या रिंगमध्ये महिला रेसलरला केलेलं KISS बॉलिवूडच्या ललनाचा हॉट बॅकलेस अवतार गर्लफ्रेंडला परत मिळवण्यासाठी ठोठावला कोर्टाचा दरवाजा