अमिताभ बच्चन Project K शूटिंगदरम्यान दुखापत; श्वास घ्यायला होतोय त्रास - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / अमिताभ बच्चन Project K शूटिंगदरम्यान दुखापत; श्वास घ्यायला होतोय त्रास
बातम्या बॉलिवूड

अमिताभ बच्चन Project K शूटिंगदरम्यान दुखापत; श्वास घ्यायला होतोय त्रास

Amitabh Bachchan Injured : मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान बिग बी जखमी झाले आहेत. अॅक्शन (Action) सीन करताना अमिताभ बच्चन जखमी झालेत. दुखापतीमुळे शूटिंग रद्द (Cancelled) करावी लागली. बिग बी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. Big B is under doctor’s care. He is undergoing treatment.

Amitabh Bachchan : ‘बिग बीं’चा आवाज, फोटो, नाव वापरणं महागात पडेल, उच्च न्यायालयानेच दिले आदेश

बरगडीला दुखापत

या अपघाताची माहिती अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. हैदराबादमध्ये प्रोजेक्ट ‘के’च्या शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याचे अभिनेत्याने सांगितले. अॅक्शन सिनदरम्यान ही घटना घडली. अमिताभ यांच्या बरगडीला दुखापत झाली आहे. अमिताभ यांनी सांगितले की उजव्या बरगडीच्या पिंजऱ्याचा बाजूचा स्नायू फाटला आहे. दुखापतीनंतर शूटिंग थांबवण्यात आली. हैदराबादच्या एआयजी हॉस्पिटलमध्ये अमिताभ बच्चन यांचे सीटी स्कॅन करण्यात आले. तपासणीनंतर बिग बी घरी परतले आहेत. डॉक्टरांनी त्यांना मलमपट्टी करून विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

श्वास घेण्यास अडचण

अमिताभ बच्चन सध्या वेगवेगळ्या त्रासातून जात आहेत. त्यांनी सांगितले की त्यांना खूप त्रास होत आहे. तसेच हालचाल आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. बिग बींना पूर्णपणे सावरण्यासाठी थोडा कालावधी लागेल. त्यांना औषधे देण्यात आली आहेत. डॉक्टरांनी काही पेन किलर देखील दिले आहेत, ज्यामुळे त्यांना वेदना कमी होऊ शकतात. सध्या डॉक्टर त्यांची योग्य ती निगा राखत आहेत. अमिताभ बच्चन लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना त्यांचे चाहते करत आहेत.

अमिताभ बच्चन यांना केबीसीत रडू कोसळलं; जया आणि अभिषेक बच्चननं सावरलं

शूटिंग थांबवले

बिग बींना दुखापत होणे हे प्रत्येकासाठी खूप त्रासदायक आहे. अमिताभ यांच्यासोबत झालेल्या या अपघातानंतर सर्व काम आणि शूटिंग रद्द करण्यात आले आहे. जोपर्यंत अमिताभ बच्चन पूर्णपणे बरे होत नाहीत तोपर्यंत चित्रपट किंवा शूटिंगशी संबंधित कोणतेही काम केले जाणार नाही.

कुलीच्या शूटिंग दरम्यानही झाली होती दुखापत

अमिताभ बच्चन या आधीही दुखापतीतून गेले आहेत. यापूर्वी त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यातून बरं होण्यासाठी त्यांना बराच अवकाश लागला. ही घटना आहे, 26 जुलै 1982 रोजीची. एक अशी बातमी आली होती जी ऐकून अमिताभ यांच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. खरंतर त्यावेळी अमिताभ त्यांच्या कुली या चित्रपटाचे शूटिंग करत होते. या चित्रपटातील फाईट सीन दरम्यान अमिताभ जखमी झाले होते. त्या सीनमध्ये पुनीत इस्सारला अमिताभ बच्चन यांच्या पोटात ठोसा मारावा लागला होता. पण चुकून तो ठोसा इतक्या वेगाने लागला की अमिताभ बच्चन यांची प्रकृती गंभीर झाली होती.

त्यावेळी बिग बींची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यावेळी सर्वजण त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत होते. अमिताभच्या चाहत्यांना त्यांचा सुपरहिरो कोणत्याही प्रकारे बरा व्हावा, असं वाटत होतं. अमिताभ कोमात गेल्याचेही सांगण्यात आले होते. आता त्यानंतर पुन्हा एकदा शूटिंगदरम्यान त्यांना दुखापत झाली आहे.

गावातील मुलींचा रॅम्पवॉक पाहून सर्वच अवाक्… ऐश्वर्या रायच्या ‘या’ बॅगच्या किंमतीत तुम्ही सगळी ‘दुबई’ फिरून याल! दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, ‘मुले जवळ यायला घाबरतात’ अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!