Nawazuddin Siddiqui : 'प्रेम करणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करू नका'; नवाजुद्दीन असं का म्हणाला?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Nawazuddin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) त्याच्या वादग्रस्त लव्ह-लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो. पत्नी आलियासोबतच्या त्याच्या वादाची आणि घटस्फोटाच्या मुद्द्याची मागे चर्चा प्रचंड रंगली होती. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले होते. मात्र, नात्यात अनेक चढ-उतार पाहिल्यानंतर दोघांनीही मुलांच्या भल्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. (don't get marry with whom you love why nawazuddin siddiqui said that)

नवाजुद्दीन सिद्दीकीचं नातं तर वाचलं पण, यासर्वात त्याने एक असा धडा शिकला आहे, जो तो आता लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. नवाजुद्दीनचे असे मत आहे की, तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याच्याशी लग्न करू नका. त्यांच्या मते लग्नानंतर प्रेम संपते.

हेही वाचा : चार तास खलबतं, भाजपची विधानसभा जिंकण्यासाठी रणनीती ठरली!

लग्नाविषयी नवाजुद्दीन नेमकं काय म्हणाला?

रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये नवाजुद्दीन नातेसंबंध, विशेषतः लग्नाबद्दल खुलेपणाने बोलला. अभिनेत्याला विचारण्यात आले, लग्न करावे का? यावर नवाजुद्दीन म्हणाला, 'असे करू नये. लग्न करण्याची काय गरज आहे? जर तुम्ही प्रेमात असाल तर तुम्ही लग्नाशिवाय जगू शकता. लग्नानंतर कपल एकमेकांना गृहीत धरू लागतात. विचार करतात की अरे हे तर माझे आहे, अशा सर्व गोष्टी घडतात. लग्नानंतर कुठे ना कुठे प्रेम कमी होऊ लागते. जेव्हा तुम्ही अविवाहित असता तेव्हा दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम असते. लग्नानंतर मुलं होतात आणि इतर अनेक गोष्टी घडतात.'

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

"जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल आणि तुमचे प्रेम आयुष्यभर टिकावे असे वाटत असेल तर त्याच्याशी लग्न करू नका. असे अनेक लोक आहेत जे विवाहित आहेत आणि त्यांच्या आयुष्यात प्रेम आहे. पण कुठेतरी मला शंका आहे. हे कपल खरंच प्रेमात आहेत की... पण ते प्रेमात असू शकतात. माझे अनेक मित्र आहेत जे अविवाहित आहेत, ते त्यांच्या आयुष्यात खूप आनंदी आहेत. त्यात कलाकारही आहेत.'

हेही वाचा : विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, उपविजेत्या संघाला किती कोटींचे बक्षीस?

 

नवाजुद्दीनला एकटेपणा आवडतो

पुढे नवाजुद्दीन म्हणाला की, 'तुमच्या कामातून तुम्हाला जो आनंद मिळतो तो इतर कशानेही मिळवता येत नाही. जर तुम्हाला काहीतरी क्रिएटिव्ह करायचे असेल तर एकटे राहा. जर तुम्हाला लग्न करावेसे वाटत नसेल तर लग्न करू नका. नवाजने सांगितले की तो एकटा खूप आनंदी आहे. त्याला एकटेपणा आवडतो.'

ADVERTISEMENT

हेही वाचा : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का? पवारांनी संपवला गोंधळ

 

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नवाजुद्दीनचा 'रौतू का राज' हा चित्रपट ZEE5 वर 28 जून रोजी प्रदर्शित होईल. या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांकडून खूप पसंती मिळालेली आहे. तसंच, त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये 'सेक्शन 108'चाही समावेश आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT