T20 World Cup 2024 Prize Money: विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, उपविजेत्या संघाला किती कोटींचे बक्षीस?

मुंबई तक

ADVERTISEMENT

icc t20 world cup 2024 final prize money india vs south africa final winner runner up prize meoney full list
टी20 वर्ल्ड कपची प्राईज मनी जाणून घेऊयात.
social share
google news

T20 World Cup 2024 Prize Money: टीम इंडिया (Team India) आणि दक्षिण आफ्रिका   (South Africa)या दोन संघात आज टी20 वर्ल्ड कपचा फायनल T20 World Cup 2024 Final) सामना खेळवला जाणार आहे. हा सामना ब्रिजटाऊन (बार्बडोस) येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. या सामन्याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींना लागली आहे. तत्पुर्वी या टी20 वर्ल्ड कपची प्राईज मनी जाणून घेऊयात. (icc t20 world cup 2024 final prize money india vs south africa final winner runner up prize meoney full list) 

टी20 वर्ल्ड कपची फायनल जिंकणारा संघ नक्कीच मालामाल होणार आहे. मात्र उपविजेत्या ठरणाऱ्या संघाला देखील बक्कळ बक्षीस रक्कम मिळणार आहे. कारण आयसीसीने या मेगा स्पर्धेसाठी बक्षीस रक्कम जाहीर केली होती. त्यामुळे नेमकी कोणाला किती बक्षीस रक्कम मिळणार आहे? हे जाणून घेऊयात. 

हे ही वाचा : Thane : पायाऐवजी प्रायव्हेट पार्टवरच...; ठाण्यात डॉक्टरचा भलताच कारनामा

T20 वर्ल्ड कप 2024 जिंकणाऱ्या संघाला अंदाजे 20.36 कोटी रुपये ($2.45 दशलक्ष) मिळतील. T20 विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेत्या संघाला एवढी रक्कम मिळणार आहे. तर अंतिम फेरीत हरणाऱ्या संघाला म्हणजेच उपविजेत्या संघाला अंदाजे 10.64
कोटी रुपये ($1.28 दशलक्ष) मिळतील.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विशेष म्हणजे उपांत्य फेरी गाठणाऱ्या संघांना समान रक्कम 6.54 कोटी रुपये ($787,500) दिले जातील. म्हणजे अफगाणिस्तान आणि इंग्लंडचे संघही श्रीमंत झाले आहेत. यावेळी T20 विश्वचषकात 20 संघ सहभागी झाले होते. एकूणच, यावेळी प्रत्येक संघाला आयसीसीकडून काही बक्षीस रक्कम देण्यात आली. सुपर-8 (दुसरी फेरी) च्या पुढे न जाणाऱ्या प्रत्येक संघाला $382,500 (अंदाजे 3.17 कोटी रुपये) देण्यात आले.

नवव्या आणि 12 व्या क्रमांकावरील संघालाही बक्षीस 

नवव्या ते 12व्या स्थानावर असलेल्या संघांना प्रत्येकी 247,500 डॉलर (अंदाजे 20.57 कोटी रुपये) मिळतील. तर 13व्या ते 20व्या क्रमांकावर असलेल्या संघांना प्रत्येकी $225,000 (अंदाजे रु. 1.87 कोटी) मिळतील. याशिवाय, सामना जिंकल्यावर (उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी वगळता) संघांना अतिरिक्त $31,154 (अंदाजे रु. 25.89 लाख) मिळतील. T20 विश्वचषकासाठी एकूण $11.25 दशलक्ष (अंदाजे 93.51 कोटी रुपये) बक्षीस रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का? पवारांनी संपवला गोंधळ

T20 विश्वचषकाची बक्षीस रक्कम

• विजेत्या संघाला : 20.36 कोटी रुपये
• उपविजेत्या संघाला : 10.64 कोटी
• उपांत्य फेरी : 6.54 कोटी रुपये
• दुसऱ्या फेरीत बाहेर पडल्यास : 3.17 कोटी रुपये
• 9व्या ते 12व्या क्रमांकाचे संघ : 2.05 कोटी रुपये
• 13व्या ते 20व्या स्थानापर्यंतचे संघ : 1.87 कोटी 
• फेरी 1 आणि फेरी 2 मधील विजय: रु 25.89 लाख

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT