Thane : पायाऐवजी प्रायव्हेट पार्टवरच...; ठाण्यात डॉक्टरचा भलताच कारनामा

मुंबई तक

ADVERTISEMENT

thane shocking story doctor performed surgery on boy private part instead of injured leg shahpur incident
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे शहापूर उपजिल्हा रूग्णालयात ही घटना घडली आहे.
social share
google news

Thane News : ठाणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 9 वर्षाच्या मुलाच्या पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर पालकांनी त्याला रूग्णालयात दाखल केले होते. मात्र रुग्णालयातील (Hospital) डॉक्टरांनी (Doctor) त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी प्रायव्हेट पार्टवर शस्त्रक्रिया केल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे शहापूर उपजिल्हा रूग्णालयात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर नागरीकांकडून संताप व्यक्त होत आहे. (thane shocking story doctor performed surgery on boy private part instead of injured leg shahpur incident) 

मुलाच्या पालकांनी एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात मित्रांसोबत खेळत असताना त्यांच्या मुलाच्या पायाला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर 15 जूनला त्याला शाहपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. यावेळी डॉक्टरांनी त्याच्या पायाचा एक्स रे काढला आणि इतर चाचण्या करून घेतल्या. त्यानंतर डॉक्टरांनी मुलाच्या पालकांना पायावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. या शस्त्रक्रियेची पालकांनी परवानगी दिली. 

हे ही वाचा : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का? पवारांनी संपवला गोंधळ

शस्त्रक्रियेची सर्व तयारी झाल्यानंतर मुलाला ऑपरेशन थिएटमध्ये नेण्यात आले. यावेळी ऑपरेशन थिएटमध्ये त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी थेट प्रायव्हेट पार्टवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. खरं तर या मुलाच्या आधी दोन मुलांच्या प्रायव्हेट पार्टवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्या दोन मुलानंतर पायाची शस्त्रक्रिया करण्यासाठी नेण्यात आलेल्या मुलावरही तीच शस्त्रक्रिया करण्यात आली. नंतर चूक लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी जखमी पायावर शस्त्रक्रिया केली. पालकांना ही घटना कळताच डॉक्टरांचा हलगर्जीपणा उघड झाला होता. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

याप्रकरणी मुलाच्या पालकांनी शहापूर पोलिसात तक्रार केली आहे. मात्र, अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तक्रारीची चौकशी सुरू असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, आरोग्य अधिकारी या आरोपांची चौकशी करणार असल्याचे सिव्हिल सर्जन डॉ.कैलास पवार यांनी सांगितले

हे ही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana : कोण करू शकतो अर्ज, कोणत्या कागदपत्रांची गरज?  जाणून घ्या सर्व

रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी गजेंद्र पवार यांनी सांगितले की, पायाच्या दुखापतीव्यतिरिक्त मुलाला फिमोसिस (हातापायांची त्वचा कडक होणे) ही समस्या देखील होती. यामुळे आम्हाला दोन ऑपरेशन करावे लागले. दुसऱ्या ऑपरेशनबाबत पालकांना माहिती देण्याबाबत ते म्हणाले की, डॉक्टर त्यांना सांगण्यास विसरले असावेत किंवा रुग्णाच्या इतर नातेवाईकांना सांगितले असावे. डॉक्टरांनी जे केले ते योग्यच होते आणि त्यात चुकीचे काही नव्हते, पण डॉक्टरांनी दिलेले स्पष्टीकरण मान्य करण्यास पालकांनी नकार दिला. रुग्णालयात एकाच दिवशी एकाच वयाच्या दोन रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT