Vidhan Sabha Election 2024 : चार तास खलबतं, भाजपची विधानसभा जिंकण्यासाठी रणनीती ठरली!

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

भाजपच्या नेत्यांची बैठक मुंबईत पार पडली.
महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्र भाजपची महत्त्वाची बैठक

point

विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजपची बैठक

point

भुपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत बैठक

Mahayuti Vidhan Sabha election 2024 : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत निराशाजनक कामगिरी राहिल्याने भाजपचे नेते कंबर कसून कामाला लागले आहेत. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सह प्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थिती मुंबईत बैठक झाली. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चिंतन झाले. याबद्दल मुंबई भाजपचे अध्यक्ष शेलार यांनीही माहिती दिली. (Central minister Ashwini Vaishnav and Bhupendra Yadav are doing assessment of BJP and Mahayuti's poor performance in loksabha elections and course correction before Maharashtra assembly elections 2024)

ADVERTISEMENT

लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळू शकले नाही. भाजपला फक्त 9 जागा मिळाल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत कामगिरी सुधारण्यासाठी भाजप जोमाने तयारीला लागली आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, सह प्रभारी अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झाली. 

बैठकीत भाजपची रोडमॅपवर चर्चा

बैठकीबद्दल बोलताना आशिष शेलार म्हणाले, "भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. साडेचार तास बैठक झाली. आम्ही विधानसभा निवडणुकीचा रोडमॅप घेऊन पुढे जाणार आहोत. 10 जुलैपर्यंत 288 विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम घेणार आहोत. यात सहकारी पक्षांना आम्ही बरोबर घेणार आहोत. सहकारी पक्षाच्या नेत्यांसोबत चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठका होतील."

हे वाचलं का?

हेही वाचा >> माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा?  जाणून घ्या सर्व 

"विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आम्ही स्थानिक पातळीवर प्लॅन घेऊन पुढे जाणार आहोत. आम्ही सरकार बनवू आणि जनतेची सेवा करू", असेही शेलार यांनी सांगितले. 

दूर गेलेल्या मतदारांपर्यंत जाणार -शेलार

लोकसभा निवडणुकीत दूरावलेल्या मतदारांबद्दल बोलताना शेलार म्हणाले, "संघटनात्मक बदलाचा काही विषय नाही. सबका साथ, सबका विकास याच घोषणेवर भाजप काम करते. त्यामुळे आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन या निवडणुका जिंकू. त्यांचा विश्वास संपादन करू. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचू. छोट्या छोट्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा पूर्ण रोडमॅप आहे." 

ADVERTISEMENT

शरद पवारांनी बोलताना विचार केला पाहिजे -आशिष शेलार

"शरद पवार वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी बोलताना विचार केला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. पवार साहेब, इंडिया आघाडीने खोटे बोलणे मान्य केले असेल. त्यामुळे खोट्या नरेटिव्हवर महाराष्ट्रात तुम्ही मते घेतली. आता जनता विचारतेय की आमच्या खात्यात 8500 हजार कधी येणार?", अशी टीका शेलार यांनी शरद पवारांवर केली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का? पवारांनी संपवला गोंधळ 

"खटा खट खटा खट एक लाख रुपये कधी येणार? तिथून तोंड लपवण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते हे फिरताहेत. महायुतीने दिलेला अर्थसंकल्प हा थेट मदत करणारा आहे", असे शेलार यांनी सांगितले.  

मोदींनी जास्त सभा घ्यावात, शेलारांनी पवारांना काय दिले उत्तर?

मोदींनी विधानसभेला जास्त सभा घ्याव्यात असे शरद पवार म्हणाले. त्यावर शेलार म्हणाले की, "त्यांच्या पोटातील ही भीती बोलत आहे. नक्कीच निवडणुकीत ते दिसेल. पवार साहेब असो वा महाविकास आघाडी... त्यांच्या पोटात मोदीजींच्या सभांची भीती भरली आहे. म्हणून ते अशा पद्धतीने विधान करत आहेत. मोदीजींच्याच नेतृत्वात आम्ही निवडणुका जिंकू", असे शेलार यांनी म्हटले आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT