Kangna Ranaut बॉलिवूडला करणार रामराम? निकालाआधी केली मोठी घोषणा!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Kangana Ranaut Make Big Announcement About her Acting Career : बॉलिवूड (Bollywood) क्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) यंदा लोकसभा निवडणूक 2024 च्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरली आहे. तिला हिमाचलमधील मंडी येथून निवडणुकीचं तिकिट मिळालं आहे. ती सध्या जोशात प्रचाराच्या तयारीला लागली आहे. तिचा विजय निश्चित होईल असा, पूर्ण विश्वास कंगनाला आहे. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंगनाने अभिनय क्षेत्रावरून मोठी घोषणा केली. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना थोडा धक्काच बसला आहे. (Is Kangna Ranaut will leave Bollywood for politics made a big announcement before Lok Sabha Election 2024 results)

राजकारणासाठी कंगना बॉलिवूड सोडणार?

कंगना रनौतने इशारा देत म्हटलं आहे की, 'जर ती यंदाची लोकसभा निवडणूक 2024 जिंकली तर, हळूहळू शोबिज लाइफस्टाइल सोडू शकते. कारण ती एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करू इच्छिते.' चित्रपट आणि राजकारण एकावेळी मॅनेज करू शकणार का? असा प्रश्न तिला विचारला असता कंगना म्हणाली की, 'मी चित्रपटात अभिनयही करते, भूमिकाही करते आणि दिग्दर्शनही करते. निवडणुकीत जिंकले आणि राजकारणात येण्याची शक्यता दिसली तर मी राजकारणच करेन. खरंतर , मला एका वेळेला एकच गोष्ट करायला आवडेल.' 

हेही वाचा : 'त्या' विधानामुळे 'मविआ'त धस्स्स! उद्धव ठाकरेंनी अखेर सोडलं मौन

'जर मला वाटत असेल की लोकांना माझी गरज आहे तर मी त्या दिशेने जाईन. मंडीतून जिंकले तरच राजकारण करेन. अनेक चित्रपट निर्माते मला राजकारणात जाऊ नको असं सांगतात. मला लोकांच्या अपेक्षांवर खरं उतरलं पाहिजे. माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे लोकांना सहन करावं लागेल हे योग्य नाही. मी एक विशेषाधिकारयुक्त जीवन जगले आहे, जर आता मला लोकांशी जोडण्याची संधी मिळाली तर मी, ती देखील स्वीकारेन. मला वाटतं, लोकांच्या तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्याबद्दल तुम्ही आधी न्याय केला पाहिजे.' असं कंगनाने स्पष्टं सांगितलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : ठाकरेंना नाशिकमध्ये मोठा झटका! शिंदेंनी एका रात्रीत फिरवला डाव

राजकारण आणि चित्रपटसृष्टीत फरक काय?

कंगना रनौतला राजकारण आणि चित्रपटसृष्टीमधला फरक विचारत, तिला हे सर्व जमतंय का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, 'चित्रपटांचे एक खोटे जग आहे. त्यातून वेगळे वातावरण तयार केले जाते. लोकांना आकर्षित करण्यासाठी एक बबल तयार केला जातो. पण राजकारण हे वास्तव आहे. मला लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत, मी लोकसेवेत नवीन आहे, खूप काही शिकण्यासारखे आहे.'

हेही वाचा : बापरे! पगार 15 हजार, पण घरात सापडले 30 कोटी; Inside Story 

परिवारवादावर कंगना काय म्हणाली?

'स्वाभाविक आहे, मला वाटतं कुठेतरी आपला परिवारवाद चित्रपट आणि राजकारणापुरता मर्यादित आहे. नेपोटिझम ही प्रत्येकाची समस्या आहे आणि असावी. जगात याला अंत नाही. ममतेतून बाहेर पडावे लागेल. जोपर्यंत आपण स्वतःचा विस्तार करतो ते म्हणजे कुटुंब. आज ते मला मंडीची मुलगी म्हणतात. हे माझे कुटुंब आहे. ममतेत कमजोर पडायचं नाहीये.' असं स्पष्ट मत कंगनाने परिवारवादावर मांडले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT