ED Raid : बापरे! पगार 15 हजार, पण घरात सापडले 30 कोटी; Inside Story 

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Alamgir Alam : झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव यांच्या घरावर छापा टाकून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रांचीमध्ये  पैशांचा ढीगच जप्त केला. प्राथमिक माहितीनुसार, ईडीने स्वीय सचिवाच्या घरातून सुमारे 30 कोटी रुपये रोख जप्त केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान आलमगीर आलमचे नाव पुढे आल्याची माहिती आहे. (News about Alamgir Alam, Jharkhand, ED and cash)

आलमगीर आलम यांच्या मंत्रालयात भ्रष्टाचार सुरू असून हा पैसा नोकरांच्या घरी जात असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. त्यानंतर मंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या घरी छापा टाकण्यात आला.

ईडीचे अधिकारी जेव्हा तेथे पोहोचले तेव्हा पगार म्हणून 15,000 रुपये मिळवणाऱ्या व्यक्तीच्या घरातून एवढी रोकड जप्त होईल याची त्यांना कल्पनाही नव्हती. मात्र, आता अधिकाऱ्यांनी नोटा मोजण्याचे यंत्र व कर्मचाऱ्यांना बोलावले आणि घामच फुटला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

10 हजार रुपयांची लाच प्रकरणाने फुटले बिंग

गेल्या वर्षी मे महिन्यात ईडीने 10,000 रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी मुख्य अभियंत्याच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. त्यांनी सांगितले की, लाचेची रक्कम मंत्र्यापर्यंत पोहोचवली जाते. त्यानंतर झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे नाव प्रथमच पुढे आले.

हेही वाचा >> ठाकरेंना मोठा झटका! शिंदेंनी एका रात्रीत फिरवला डाव

या तपासादरम्यान आलमगीर यांचा स्वीय सचिव संजीव लाल याचे नाव समोर आले असून, आता संजीव लाल यांच्या घरात काम करणाऱ्या नोकराकडून ही रोकड जप्त करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

निशिकांत दुबे यांनी काँग्रेसवर साधला निशाणा 

या प्रकरणावरून भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला आहे. गोड्डा येथील काँग्रेसचे उमेदवार प्रदीप यादव यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, "३० कोटींहून अधिक रक्कम आणि मोजणी सुरू आहे... आज ईडीच्या कारवाईत, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि भ्रष्टाचार शिरोमणी हेमंत सरकारचे मंत्री आलमगीर आलम यांच्या स्वीय सचिव संजीव लाल यांच्यावर ED ची मोठी कारवाई. संजीव लाल यांच्या घरात 30 कोटींहून अधिक रक्कम सापडली आहे..."

ADVERTISEMENT

कोण आहे आलमगीर आलम?

आलमगीर आलम हे पाकूर विधानसभेतून चार वेळा काँग्रेसचे आमदार राहिले आहेत आणि सध्या ते झारखंड सरकारमध्ये संसदीय कामकाज आणि ग्रामीण विकास मंत्री आहेत. याआधी आलमगीर आलम 20 ऑक्टोबर 2006 ते 12 डिसेंबर 2009 पर्यंत झारखंड विधानसभेचे अध्यक्ष होते.

हेही वाचा >> सुप्रिया सुळे अजित पवारांवर प्रचंड चिडल्या, ''तुम्हाला कुटुंबाची, पक्षाची, महाराष्ट्राची...''

सरपंचपदाची निवडणूक जिंकून आलमगीर यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली. 2000 साली ते पहिल्यांदा आमदार झाले आणि तेव्हापासून ते आतापर्यंत 4 वेळा आमदार बनले.

काँग्रेस खासदाराकडून जप्त केली होती 350 कोटींची रोकड

गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही झारखंडमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली होती. काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि उद्योगपती धीरज साहू यांच्या घरातून आयकर विभागाने 350 कोटींहून अधिक रोख जप्त केली होती.

याला उत्तर देताना त्यांनी छाप्यात जप्त केलेली रोकड माझ्या दारू कंपन्यांची असल्याचे सांगितले होते. दारूचा व्यवसाय केवळ रोखीने चालतो आणि त्याचा काँग्रेस पक्षाशी काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले होते. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT