महेश भट्ट यांनी तर ठरवलंय; राहा 16 वर्षांची होताच तिला 'या' व्यक्तीचा दाखवणार चित्रपट!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राहाच्या जन्मामुळे आयुष्याकडे पाहण्याचा बदलला दृष्टिकोन 

Mahesh Bhatt on Granddaughter Raha : चित्रपट निर्माते महेश भट्ट आजोबा झाल्यापासून खूप आनंदी आहेत. ते म्हणतात की, रणबीर-आलिया यांची मुलगी राहा म्हणजेच त्यांच्या नातीचा जन्म झाल्यापासून त्यांचे आयुष्य आता पूर्वीसारखे राहिलेले नाही. त्यात दररोज होणारे बदल पाहून ते थक्क होतात. तसंच, एका मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, असा कोणता चित्रपट आहे जो ते त्यांच्या नातीला (राहा) पहिल्यांदा दाखवू इच्छितात? त्यावर महेश भट्ट यांनी खास उत्तर दिलं आहे. (mahesh bhatt says he is waiting raha kapoor to turn 16 will show her pooja bhatt film not alia bhatt)

ADVERTISEMENT

हा प्रश्न ऐकताच महेश भट्ट जोरात हसले आणि म्हणाले, 'मला राहा जेव्हा 16 वर्षांची होईल तेव्हा 'दिल है की मानता नही' हा चित्रपट दाखवायला आवडेल. हा चित्रपट हृदयाला स्पर्श करणाऱ्या चित्रपटांपैकी एक आहे, ज्यामध्ये पूजा जगापासून पूर्णपणे विभक्त दिसली. आमिर खरोखरच चांगला होता. आजही लोकांच्या हृदयाशी जोडला जाणारा हा चित्रपट आहे. मला वाटते की असा चित्रपट माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट असेल आणि मी राहासाठी प्रथम त्याची निवड करेन.'

हेही वाचा: Mukhyamantri Vayoshri Yojana : जेष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये, वाचा 'मुख्यमंत्री वयोश्री योजने'ची A टू Z माहिती

1991 मध्ये आलेल्या या चित्रपटात आमिर खान महेश भट्ट यांची मोठी मुलगी पूजा भट्टसोबत मुख्य भूमिकेत होता. चित्रपटासोबतच त्यातील गाणी आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. 

हे वाचलं का?

राहाच्या जन्मामुळे आयुष्याकडे पाहण्याचा बदलला दृष्टिकोन 

महेश भट्ट यांनी राहाच्या (आलियाची मुलगी) जन्मानंतर आयुष्यात झालेल्या बदलांबद्दलही सांगितले. महेश म्हणाले की, राहा आल्यानंतर जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन बदलला आहे.

हेही वाचा: Pooja Khedkar : पूजा खेडकरांना कुठल्याही क्षणी अटक होणार? अटकपूर्व जामीन फेटाळला

महेश भावूक होत म्हणाले, 'मी माणसाच्या दृष्टीकोनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो. विशेषतः आजोबा झाल्यावर. खरं सांगायचं तर, मी अजूनही माझ्या मुलांच्या आश्चर्यकारक कामगिरीतून बाहेर पडू शकलो नाहीये आणि आता तर मातृत्वाचा आणखी एक नवा अध्याय जोडला गेला आहे. आलिया केवळ एक हुशार अभिनेत्रीच नाही तर एक उत्तम आई देखील आहे. हा खूप मोठा बदल झाला आहे, आणि राहा ही आकाशातून मिळालेल्या भेटीसारखी आहे.'

ADVERTISEMENT

हेही वाचा: Mazi Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री शिंदेंची प्रचंड मोठी घोषणा, व्हिडीओच केला शेअर!

महेश भट्ट पुढे म्हणाले, 'जर प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, आता माझे संपूर्ण लक्ष माझ्या नातीकडे वळले आहे. मी मुलीपेक्षा तिच्यावर जास्त प्रेम करायला लागलो आहे. मला वाटते की लहान मुलांमध्ये अशी शक्ती असते की ते तुम्हाला पूर्णपणे त्यांच्याकडे खेचतात.'

ADVERTISEMENT

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, महेश भट्ट यांचा 'ब्लडी इश्क' लवकरच रिलीज होणार आहे. याचे लेखन महेश भट्ट यांनी केले असून दिग्दर्शन विक्रम भट्ट यांनी केले आहे. अविका गोर, वर्धन पुरी आणि जेनिफर पिकिनाटो या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २६ जुलैपासून डिस्ने + हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT