नुकतंच अभिनेत्री मानसी नाईक लग्नबंधनात अडकली आहे. बॉक्सर आणि मॉडल प्रदीप खरेरासोबत तिने सात फेरे घेतले. लवकरच मानसी आणि तिचा पती प्रदीप खरेरा एका म्युसिक अल्बच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 12 मार्च रोजी हा अल्बम प्रदर्शित होणार आहे.
वाटेवरी मोगरा असा प्रदीप आणि मानसी यांच्या या म्युसिक अल्बमचं नाव आहे. निलेश मोहरीर यांनी या गाण्याची सुंदर रचना केलीये आहे. तर स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत या दोघांनी हे गाणं गायलं आहे.
अभिनेत्री मानसी नाईकने या म्युसिक अल्बमचा व्हिडीयो सोशल मीडियावरूनही शेअर केला आहे. या व्हिडीयो शेअर करताना आमचं लव साँग…लवकरच येणार आहे…” असं कॅप्शन दिलं आहे. दरम्यान या नवीन जोडीला पाहण्यासाठी चाहते देखील फार उत्सुक आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये सागरीकाच्या अनेक व्हिडियोंमध्ये झळकलेली मानसी नाईक आता एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे. मानसी नाईकचा आत्तापर्यंतचा हा पहिलाच रोमँटिक म्युझिक व्हिडिओ आहे. नवीनच लग्न झालेल्या मानसीसोबत तिचा नवरा प्रदीप खरेरा यात तिच्यासोबत असल्यामुळेच हा म्युझिक विडिओ अजूनच खास झाला आहे. या म्युझिक व्हिडिओतून ते पहिल्यांदाच एकत्रित दिसणार आहेत. 12 मार्चला सागरिका म्युझिकच्या मराठी यूट्यूब चॅनेलवर हे गाणे रिलीज होणार आहे.