Shilpa Shetty welcomed sister Shamita shetty: बिग बॉस ओटीटी शोमधून बाहेर आल्यावर शिल्पाने शमिताचं केलं खास स्वागत

शिल्पाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत शमिताचे घरी स्वागत केले आहे. तिने शमिता सोबत एक फोटो शेअर केला
Shilpa Shetty welcomed sister Shamita shetty: बिग बॉस ओटीटी शोमधून बाहेर आल्यावर शिल्पाने शमिताचं केलं खास स्वागत
Ajay Shriram Parchure

बिग बॉस ओटीटीचं विजेतेपद दिव्या अग्रवालने पटकावलं. पण ओटीटीवर झालेल्या या पहिल्या सिझनमध्ये सर्वात लोकप्रिय होती ती अभिनेत्री शमिता शेट्टी.. १८ सप्टेंबरला या शोचा महाअंतिम सोहळा पार पडला.. या सोहळ्यात दिव्याने विजेतपद पटकावलं, निशांत भट्ट दुसऱ्या स्थानावर तर शमिता शेट्टी तिसऱ्या स्थानावर विजेती झाली. ‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर बहीण शिल्पा शेट्टीने शमिताचे अतिशय स्पेशल स्वागत केलं.

शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर सक्रिय असते आणि सतत पोस्ट शेअर करताना दिसते. शिल्पाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत शमिताचे घरी स्वागत केले आहे. तिने शमिता सोबत एक फोटो शेअर केला, या फोटोत तिने शमिताला घट्ट मिठी मारली असल्याचे दिसत आहे. या फोटोला तिने कॅप्शन दिलं, “माझी टुनकी परत आली आणि आता तुला घट्ट मिठी मारण्यापासून मला कोणी थांबवू शकत नाही. बहीणा बाई घरी तुझे खूप खूप स्वागत आहे.” शमिता आणि शिल्पाच्या या फोटोवर नेटकरी फिदा झाले आहेत आणि लाइक्सचा वर्षाव होतं आहे.

शिल्पा आणि शमिताचे फॅन्स कमेंट करत त्यांच्या या जोडीचे कौतुक करताना दिसत आहेत. हा फोटोवर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान ‘बिग बॉस ओटीटी’ च्या घरात शमिता शेट्टी आणि राकेश बापटची जोडी प्रचंड चर्चेत होती. ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीची होती. शो मध्ये शमिताला खूप हुकूमत गाजवणारी आहे तर राकेश खूप जैंटलमैन आहे असे म्हंटले जात होते. राकेश आणि शमिताची ही जोडी बिग बॉस घराच्या बाहेर अशीच राहते का हे पाहण्यासाठी आता फॅन्स खूप उत्सुक आहेत.शमिता बिग बॉसच्या घरात जण्यापूर्वी पासून चर्चेत होती. शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर शिल्पा शेट्टी आणि शमितासंदर्भात देखील बऱ्याच चर्चा झाल्या. शिल्पाला या सगळ्या विषयी माहित होते अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र तिने या बद्दल अनेक पोस्ट शेअर करत या बाबतीत स्पष्टीकरण दिलं आहे.

Related Stories

No stories found.