सोनू सूदकडे घरं आणि कारचं कलेक्शन! किती आहे महिन्याची कमाई? एका चित्रपटासाठी घेतो...

सोनू सूद १३० कोटी संपत्ती मालक... : अंधेरीतील लोखंडवालामध्ये आहे 2600 चौरस फुटाचं 4 BHK अपार्टमेंट
सोनू सूदकडे घरं आणि कारचं कलेक्शन! किती आहे महिन्याची कमाई? एका चित्रपटासाठी घेतो...
अभिनेता सोनू सूद.Sonu sood/Instagram

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात गरजूंच्या मदतीसाठी धावून जाणारा आणि अजूनही मदत करणारा अभिनेता सोनू सूद सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. कर चोरी केल्याच्या आरोपामुळे सोनू सूदबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळे अनेकजण त्यांच्या संपत्तीबद्दलही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

आयकर विभागाच्या रडारवर असलेला अभिनेता सोनू सूद सध्या १३० कोटी रुपयांच्या संपत्ती मालक आहे. सोनू सूदनं वयाच्या ४८ व्या वर्षी इतकी संपत्ती कमावली आहे. caknowledge.com माहितीनुसार सप्टेंबर २०२१ मध्ये सोनू सूदची संपत्ती १३९ कोटी इतकी आहे.

अभिनेता सोनू सूद.
देशाचा पंतप्रधान बनणार का? चाहत्यांच्या प्रश्नावर अभिनेता सोनू सूद म्हणतो...

गरीबांच्या मदतीसाठी धावून जाणारा सोनू सूद मुलं आणि पत्नीसह मुंबईत राहतो. सोनू सूदने बॉलिवूडमध्ये चित्रपटांमध्ये काम करतो. त्याचबरोबर तेलगु, तमिळ, कन्नड आणि पंजाबी या प्रादेशिक भाषेतील चित्रपटांमध्येही त्याने भूमिका साकारल्या आहेत. सोनू सूद प्रत्येक चित्रपटासाठी २ कोटी रुपये मानधन घेतो.

सोनू सूदचं स्वतः प्रॉडक्शन हाऊसही आहे. शक्ति सागर प्रॉडक्शन हाऊस असं त्याचं नाव असून, सोनूने आपल्या वडिलांचं नाव त्याला दिलं आहे. सोनू सूदने आतापर्यंत ७० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केलेलं असून, विविध ब्रॅण्डच्या जाहिराती आणि चित्रपटाच्या माध्यमातून तो महिन्याला १ कोटी रुपये कमावतो.

अभिनेता सोनू सूद.
अभिनेता सोनू सूदने 20 कोटींची करचोरी केली; आयकर विभागाचा दावा

सोनू सूदकडे कारचंही कलेक्शन आहे. त्याचबरोबर त्याचे विविध ठिकाणी घरंही आहेत. सोनू सूद आपल्या कुटुंबासोबत अंधेरीतील लोखंडवाला येथे २६०० चौरस फूट एरिया असलेल्या ४ बीएचके अपार्टमेंटमध्ये राहतो.

अभिनेता सोनू सूद.
'सख्त राहों में भी आसान सफर लगता है!' Sonu Sood ने त्या आरोपांवर सोडलं मौन!

याशिवाय मुंबईत दोन ठिकाणी सोनू सूदचे फ्लॅट आहेत. मोगामध्येही त्याचा बंगला आहे. जुहूमध्ये हॉटेल आहे. याशिवाय त्याच्याकडे ६६ लाखांची मर्सिडीज बेंज एमएल क्लास ३५० सीडीआय, ८० लाखांची ऑडी क्यू ७ आणि २ कोटींची पॉर्श पनामा कारही आहे.

Related Stories

No stories found.