Mamta Kulkarni New Name: ममता कुलकर्णी नाही तर आता 'हे' असेल नवं नाव, किन्नर आखाड्यात गेली अन्...
Mamta Kulkarni: ममता कुलकर्णी ही किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे. आता तिची जुनी ओळख पुसण्यात आली आहे. तिला नवीन नाव देखील देण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT

प्रयागराज: बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बनली आहे. आज (24 जानेवारी) संध्याकाळी तिने संगम येथे तिचे पिंडदान केले. यानंतर, किन्नर आखाड्यात तिचा पट्टाभिषेक झाला. ममताने किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी महाराज आणि जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी जय अंबानंद गिरी यांचीही भेट घेतली.
ममताला दिलं नवं नाव
किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर लक्ष्मी त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णीबद्दल बोलताना म्हटलं की, 'ममता गेल्या 2 वर्षांपासून आमच्या संपर्कात होती. तिला सनातनमध्ये सामील व्हायचे होते. ती पूर्वी जुना अखाड्यात शिष्या होती. मग ती आमच्या संपर्कात आली. मग तिने पदाची मागणी केली. ती म्हणाला की तिला महामंडलेश्वर व्हायचे आहे. मग आम्ही सांगितले की हे सर्व करावे लागेल.'
हे ही वाचा>> Mamta Kulkarni: बोल्ड सीनचा धुरळा उडवणारी ममता कुलकर्णी बनली संन्यासी, किन्नर आखाड्याची...
ममता कुलकर्णीने संगममध्ये तिचे पिंडदान केले. यामध्ये तिने फुलांनी सजवलेल्या ताटात दिवा ठेवला आणि तो गंगेत प्रवाहित केला. यानंतर अभिनेत्रीने पवित्र पाण्यात डुबकी मारली. माध्यमांशी बोलताना ममता कुलकर्णी म्हणाली- 'हा महादेव, माँ काली आणि माझ्या गुरूंचा आदेश होता. हे सर्व त्यांनी ठरवले होते. त्यांनी आजचा दिवसही ठरवला होता. मी काहीही केलेले नाही.'
ममता कुलकर्णीला आता एक नवीन नाव देण्यात आले आहे. तिचे नाव श्री यामिनी ममता नंद गिरी असे घोषित करण्यात आले आहे. ममता कुलकर्णीची वेणी कापली जाईल. मग पिंडदान होईल. जसा किन्नर आखाड्यात कायदा आहे, तसंच इथेही असेल.










