सई-आदित्य जाणार हनिमूनला; ‘माझा होशील ना’ मनालीतील स्पेशल एपिसोड्स

मुंबई तक

झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ मालिकेत येत्या आठवड्यात सई आदित्यच्या हनिमूनचे भाग पहायला मिळणारेत. हे विशेष भाग नयनरम्य बर्फाच्छादित पर्वतांमध्ये वसलेल्या मनालीमध्ये शूट करण्यात आले आहेत. हे हनिमून फक्त सई-आदित्यचं न राहता ही एक कौटुंबिक सहलच ठरणार आहे. आदित्यचे सगळे मामा ह्या ट्रिपमधे सई-आदित्यबरोबर असणार आहेत. त्याच बरोबर बंधूमामाची जगापासून लपवून ठेवलेली बायको गुलप्रीत सुद्धा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ मालिकेत येत्या आठवड्यात सई आदित्यच्या हनिमूनचे भाग पहायला मिळणारेत. हे विशेष भाग नयनरम्य बर्फाच्छादित पर्वतांमध्ये वसलेल्या मनालीमध्ये शूट करण्यात आले आहेत.

हे हनिमून फक्त सई-आदित्यचं न राहता ही एक कौटुंबिक सहलच ठरणार आहे. आदित्यचे सगळे मामा ह्या ट्रिपमधे सई-आदित्यबरोबर असणार आहेत.

त्याच बरोबर बंधूमामाची जगापासून लपवून ठेवलेली बायको गुलप्रीत सुद्धा मनालीत येऊन धडकणार आहे. सगळ्या ब्रह्मे कुटुंबासमोर बंधू आणि गुलप्रीतचं प्रकरण समोर येतं का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

सई-आदित्यचा रोमान्स, मामांची बर्फातली धमाल, बंधूमामाची तारांबळ, पर्यटन स्थळं, नदीकाठचा कॅंप, कडाक्याची खंडी आणि निसर्गरम्य मनाली ह्या साऱ्या गोष्टींनी भरलेले हे धमाल एपिसोड्स संपूर्ण आठवडाभर बघायला मिळणार आहेत.

शेवटाला एक मोठा ट्विस्ट ब्रह्मे कुटुंबाच्या आयुष्यात येणार आहे असंही समजतंय! तेव्हा कोरोना आणि निर्बंधांमुळे घरीच अडकलेल्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना घरबसल्या थंडगार मनाली फिरण्याचा आणि सोबत रोमान्स, विनोद आणि नाट्य ह्याने ठासून भरलेल्या भागांचा आनंद लुटता येणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp