लक्ष्याच्या कडेवर असलेली ही चिमुरडी करतेय सिनेइंडस्ट्रीत पदार्पण - Mumbai Tak - swanandi berde shares the fondest memory of her superstar father laxmikant berde - MumbaiTAK
मनोरंजन

लक्ष्याच्या कडेवर असलेली ही चिमुरडी करतेय सिनेइंडस्ट्रीत पदार्पण

आज माझे बाबा म्हणजे मराठीतील सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे माझ्या नवीन नाटकाच्या मुहुर्तला हवे होते,असे भावूक उद्गार काढलेत त्यांची मुलगी स्वानंदी बेर्डेने. धनंजय माने इथेच राहतात .. या व्यावसायिक नाटकाद्वारे स्वानंदी बेर्डे अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहे. मुंबई तकने यानिमित्त घेतलेल्या विशेष मुलाखतीत स्वानंदीने आपल्या वडिलांच्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणी जागवल्या.. बाबांना मी नाटकातून पदार्पण करतेय […]

आज माझे बाबा म्हणजे मराठीतील सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे माझ्या नवीन नाटकाच्या मुहुर्तला हवे होते,असे भावूक उद्गार काढलेत त्यांची मुलगी स्वानंदी बेर्डेने. धनंजय माने इथेच राहतात .. या व्यावसायिक नाटकाद्वारे स्वानंदी बेर्डे अभिनेत्री म्हणून पदार्पण करत आहे. मुंबई तकने यानिमित्त घेतलेल्या विशेष मुलाखतीत स्वानंदीने आपल्या वडिलांच्या म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डेंच्या आठवणी जागवल्या.. बाबांना मी नाटकातून पदार्पण करतेय याचा विशेष आनंद झाला असता. बाबांनीही आपलं करियर एकांकिका,नाटकापासूनच सुरू केलं होतं. त्यामुळे बाबांना माझ्या या निर्णयाने समाधन मिळालं असतं असं मत स्वानंदीने यावेळी व्यक्त केलं.

लक्ष्मीकांत बेर्डेच्या आठवणी जागवताना स्वानंदीने अनेक गोष्टी मुंबई तक सोबत शेअर केल्या. आज बाबा असते तर त्यांनी नक्की मला नाटकात काम करण्यासाठी मदत केली असती, अनेक उपयोगात येतील असे मोलाचे सल्ले दिले असते. लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे विनोदाचं दर्जेदार टायमिंग . याबाबतीत त्यांचा हात धरणारा कलाकार अजून तरी निर्माण झाला नाहीये. बाबांचं विनोदाचं टायमिंग हे मला शिकण्यासारखं आहे. मला ही मुळात विनोदी भूमिका करणं प्रचंड आवडतं. त्यामुळे बाबांसारखंच मी ही माझ्या करिअरची सुरवात विनोदी नाटकाने केली आहे याचा मला अभिमान वाटतोय. आई प्रिया बेर्डे आणि भाऊ अभिनय बेर्डे हे दोघंसुध्दा मला या क्षेत्रात येण्यासाठी भक्कम पाठबळ आणि मदत करतायत. आईने मला नाटक सुरू झाल्यपासूनच घरातच शिकवणी सुरू केली असून, उत्तम मराठी बोलण्याकडे लक्ष दे, त्यासाठी मराठी भाषेवर मेहनत घे असा मोलाचा संदेश दिला आहे.

धनंजय माने इथेच राहतात का? हा अशी ही बनवा बनवी नाटकातील अजरामर संवाद आजही प्रत्येक नाटक सिनेमा वेड्या रसिकाचा अगदी तोंडपाठ आहे. याच संवादाचं नाव असलेलं हे नाटक मार्च महिन्यात रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचं दिग्दर्शन राजेश देशपांडे करत असून, या नाटकात स्वानंदीसोबतच तीची आई आणि प्रसिद्धी अभिनेत्री प्रिया बेर्डेही या नाटकात प्रमुख भूमिकेत आहे. नुकताच या नाटकाचा बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात मुहर्त झाला. या नाटकाच्या तालमी आता जोरदार सुरू असून. बेर्डे घराण्यातील पुढच्या पिढीची स्वानंदी बेर्डे रंगभूमीवर दिमाखात पदार्पण करण्यासाठी आता सज्ज झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

sixteen + 15 =

Vicky Kaushal वर सचिन तेंडुलकर इम्प्रेस; कारण… Alcohol चा रिकाम्या पोटी कसा होतो परिणाम? ‘या’ 5 गोष्टी खाऊन चुटकीसरशी घटवा Belly Fat! दिया मिर्झा ‘या’ एका गोष्टीने करते दिवसाची सुरूवात, जाणून घ्या Fitness रूटीन! Weight Gain करायचंय? फक्त ‘ही’ एक गोष्ट खा, सप्लीमेंटची पडणार नाही गरज! ‘सुशांत सिंह राजपूत ओव्हर सेंसिटिव्ह…’, मुकेश छाबरांनी असं काय सांगितलं? ‘दुआओ मे याद रखना’, स्टार कोरिओग्राफर अडकला लग्नबंधनात! PHOTOS Kiara Advani च्या हॉट-टोन्ड फिगरचं खास सीक्रेट, कशी राहते एवढी Fit? Shehnaaz ने शेतात केली मस्ती; Viral फोटो पाहून चाहतेही झाले खुश! Wine पाण्यासोबत का घेत नाहीत? Almond : गरजेपेक्षा जास्त बदाम खाताय! ‘हे’ दुष्परिणाम माहिती आहेत का? तुम्हाला तर ‘या’ सवयी नाहीत ना? असतील तर वाढेल तुमचं Belly Fat! Virat Kohli : ग्लॅमरस फुटबॉलर विराट कोहलीवर फिदा, कोण आहे ‘ती’? मलायकानंतर गर्लफ्रेंडने साथ सोडली, अरबाजच्या ब्रेकअपची चर्चा ‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग