Mumbai Tak /बातम्या / Rakhi sawant : राखी सावंतच्या पतीला पोलिसांनी का घेतलं ताब्यात?
बातम्या मनोरंजन

Rakhi sawant : राखी सावंतच्या पतीला पोलिसांनी का घेतलं ताब्यात?

Rakhi sawant’s husband aadil Detained by police :

राखी सावंतचा पती आदिल दुर्राणी (Rakhi Sawant husband Adil Durrani) याला मंगळवारी सकाळी पोलिसांनी पकडले. सध्या आदिलवर 504, 506, 323 आणि 406 असे चार कलम लावण्यात आले असून त्याअंतर्गत (Police detained ) पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आदिल सध्या ओसिवरा येथील पोलीस ठाण्यात (oshiwara police station) आहे, जिथे त्याचे फोन जप्त करण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. Adil’s phone was seized and the investigation started

राखी सावंतने aajtak.in शी बोलताना सांगितले की, पोलिसांनी सकाळी आदिलला पकडले आणि घेऊन गेले. त्याने माझ्यासोबत खूप वाईट केले आहे. सकाळी तो माझ्या घरी आला आणि माझ्याशी भांडू लागला. मी ताबडतोब पोलिसांना फोन केला आणि पोलीस त्याला घेऊन गेले. मी दोन दिवसांपूर्वी एफआयआर दाखल केला होता. एनसी दाखल झाली होती, ज्याच्या आधारे पोलिसांनी त्याचे एफआयआरमध्ये रूपांतर केले. तो काही न बोलता सकाळी मला भेटायला आला होता आणि माझ्यावर जबरदस्ती करू लागला. मी याआधीही आदिलविरुद्ध दोनदा खटला दाखल केला होता, पण मीडियासमोर कधीही त्याचा उल्लेख केला नाही. त्यावेळी पोलिसांनीही आदिलला समजावले होते. काल रात्री एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

राखीला घटस्फोट हवा आहे

राखी पुढे म्हणते, मला आदिलसोबत आता तडजोड करायची नाही. मी अशा माणसासोबत राहू शकत नाही जो इतक्या मुलींसोबत रिलेशनमध्ये राहतो. त्याने माफी मागावी आणि तनूला सोडून माझ्याकडे यावे अशी माझी इच्छा होती. आता घटस्फोट घ्यायचा आहे, असे मी ठरवले आहे, असं राखी म्हणाली.

‘मी इस्लाम स्वीकारला, फातिमा बनले’; राखी सावंत लव्ह जिहादबद्दल काय बोलली?

चार लाखांची रोकड व दागिने घेऊन पळ काढला

राखीच्या म्हणण्यानुसार, आदिलने पैसेही लुटले आहेत. दोन दिवसांपूर्वी तो माझ्या घरातून चार लाखांचे दागिने घेऊन निघून गेला आहे. त्याने मला खूप मोठा चुना लावला. पैसे देऊनही खूप लुटले, असं ती म्हणाली. काल रात्री राखी आदिलसोबत रेस्टॉरंटमध्ये जेवण करतानाही दिसली होती, ज्याच्या उत्तरात राखीने सांगितले की, आदिल अचानक माझी माफी मागण्यासाठी तिथे आला होता. मला त्याच्याशी बोलायचंही नव्हतं, पण तिथल्या मीडियाच्या सांगण्यावरून तो मला खाऊ घालू लागला. पण आम्ही बोललो नाही.

राखी सावंत विरोधात गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण..

पोलीस काय म्हणाले?

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या निरीक्षक रजनी साळुंखे यांनी सांगितले की, आम्ही नुकतेच आदिलला सकाळी ताब्यात घेतले आहे. सध्या प्रक्रिया सुरू आहे. राखीने एफआयआर दाखल केला आहे. याआधीही राखीने दोनदा तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतरच सांगता येईल. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही आदिलचा शोध घेत होतो. त्याला फोन केल्यावर तो भेटणे टाळायचा. आज सकाळी राखीला फोन आला की आदिल तिच्या घरी आहे. म्हणून आज आम्ही जाऊन त्याला पकडले. राखीचे जे काही आरोप असतील, ते पडताळले जातील, असं ते म्हणाले.

एकाच वेळी घेतला तीन मुलींनी जन्म, रचला ‘हा’ विक्रम बिकनीत फोटो शेअर करण पडलं महागात, तरूणीला लाखोंचे नुकसान भारतातील हे राज्य चक्क झाडांना देते पेन्शन, नाव आहे प्राण वायू देवता योजना Rohit Sharma: धोनीची ही शेवटची आयपीएल असेल का? पत्रकारांच्या प्रश्नावर रोहितने दिलं खास उत्तर parineeti chopra raghav chadha : राघवबद्दल प्रश्न विचारताच परिणीती लाजली, पुढे काय घडलं? Dalljiet Kaur : ब्लॅक सेन्शुअल ड्रेसमध्ये दलजीतचे हॉट फोटोशूट, पतीसोबत दिल्या रोमॅंटिक पोज अन्वेषी जैनच्या फिट बॉडीचं रहस्य काय? समजून घ्या काय करते दारूच्या सेवनाने ‘ही’ गोष्ट तुम्हाला कधीच मिळत नाही…: रिसर्च 4 पतींसह 11 लोकांचा जीव घेणारी लेडी सिरीयल किलर cross legs sitting: तुम्हीही असं बसता, बघा काय आहेत दुष्परिणाम? UPSC च्या तयारीसाठी नोट्स कशा असाव्यात? या सोप्या टिप्स वाचा Akanksha Dubey: आत्महत्येपूर्वी आकांक्षाचा या व्यक्तीला शेवटचा मेसेज, म्हणाली… vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं? Danish Alfaaz: टिकटॉक स्टार दानिश अल्फाजवर बलात्काराचा गुन्हा, नेमकं काय घडलं? Nanded: निवृत्त झाले तरीही करतात ‘ड्युटी’; पोलीस कर्मचाऱ्याच्या निशुल्क सेवेची होतेय चर्चा पुणेकरांचा प्रवास होणार सुखद! नव्या मार्गांवर धावली मेट्रो पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोंब! ‘या’ गोष्टींच्या किंमती ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘बाप रे’ ‘तारक मेहता’साठी मिळेना दया बेन! शोधाशोध करून निर्मातेही थकले Lalu Prasad Yadav: इवली इवली बोटं, नातीला कुशीत घेतल्यानंतर असे होते लालूप्रसादाचे भाव BCCI contract list : रोहित, कोहली ते सूर्यकुमार यादव, कोणत्या खेळाडूला किती पगार?