Budget 2024 : पहिलं बजेट मांडणारा होता ब्रिटीश नागरीक…, काय आहे भारतीय अर्थसंकल्पाचा इतिहास?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा अंतिम अर्थसंकल्प असणार आहे.पण तुम्हाला भारतीय अर्थसंकल्पाचा इतिहास माहिती आहे. त्याची सुरूवात कशी झाली? आणि तो कसा सादर केला जायचा? हे जाणून घेऊयात.
ADVERTISEMENT

Parliament Budget 2024, Nirmala Sitharaman : देशात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात बजेट सादर करण्यात येतो. या बजेटच्या माध्यमातून शेतकरी, नोकरवर्ग, सर्वसामान्य आणि व्यावसायिकांना अपेक्षा असतात. त्यामुळे या सर्व वर्गाचे याकडे लक्ष असते. तुम्हाला भारतीय अर्थसंकल्पाचा इतिहास माहिती आहे. त्याची सुरूवात कशी झाली? आणि तो कसा सादर केला जायचा? हे जाणून घेऊयात. (budget 2024 niramla sitharaman speech pm narendra modi what is the history of indian budget)
भारताचा पहिला अर्थसंकल्प हा 7 एप्रिल 1860 रोजी सादर करण्यात आला होता. त्यावेळेस भारत इंग्रजांच्या राजवटीखाली होता. 19व्या शतकाच्या सहाव्या दशकात, म्हणजे 7 एप्रिल 1860 रोजी, स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि ईस्ट इंडिया कंपनीचे राजकारणी जेम्स विल्सन यांनी ब्रिटिश राजवटीच्या वतीने भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला होता.
हे ही वाचा : Prashant Kishor : भाजप 400 जागा जिंकू शकतं का? प्रशांत किशोरांची मोठी भविष्यवाणी
या अर्थसंकल्पात उत्पन्नाच्या स्त्रोताच्या चार घटकांचा लेखाजोखा मांडला गेला होता. यामध्ये त्यांनी मालमत्ता, व्यवसाय किंवा व्यवसायातील महसूल, रोखे, पगार आणि पेन्शनचे उत्पन्न समाविष्ट केले होते. त्यावेळी कराचे दोनच स्लॅब होते.
स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प
दरम्यान 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत आझाद झाला. आणि 26 नोव्हेंबर 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले. 26 नोव्हेंबर 1947 रोजी कार्यकारी सरकारमधील अर्थमंत्री षण्मुखम शेट्टी यांनी स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. देशाच्या पहिल्या अर्थसंकल्पात खर्चाचा अंदाज 197.29 कोटी रुपये होता, तर उत्पन्न 171.15 कोटी रुपये अपेक्षित होते. वित्तीय तूट 26.24 कोटी रुपये होती.
