मुंबईची खबर: काय सांगता... खरं की काय? मुंबईकरांना चक्क स्वस्तात मिळणार वीज?
टाटा पॉवर, बेस्ट आणि अदानी इलेक्ट्रिसिटीकडून मुंबईतील विविध भागात वीजेचा पुरवठा केला जातो. आता यांच्यासोबत महावितरण मुंबईकरांना स्वस्त वीज उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नात असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईकरांना स्वस्तात मिळणार वीज

स्वस्त दरात वीज उपलब्ध करण्यासाठी महावितरणचे प्रयत्न

महावितरणचे मुंबईत वीज वितरणचे जाळे
Mumbai News: सध्याच्या काळात वीजेचे वाढते दर राज्यातील वीज ग्राहकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. अशातच आता मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबई आणि उपनगरात वेगवेगळ्या इलेक्ट्रिसिटी कंपन्यांमधून वीज पुरवठा केला जातो. टाटा पॉवर, बेस्ट आणि अदानी इलेक्ट्रिसिटीकडून मुंबईतील विविध भागात वीजेचा पुरवठा केला जातो. आता यांच्यासोबत महावितरण मुंबईकरांना स्वस्त वीज उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नात असल्याचं समोर आलं आहे.
महावितरणने वीज नियामक आयोगाकडे मुंबईतील शहरांमध्ये वीज पुरवठा करण्याचा परवाना मागितला आहे. महावितरण अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. टाटा पॉवर, बेस्ट आणि अदानी इलेक्ट्रिसिटीच्या तुलनेत मुंबईकरांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करुन देणार असल्याचा दावा लोकेश चंद्र यांनी केला आहे. खरंतर, मुंबईमध्ये महावितरणचे वीज पुरवठा करण्याचे जाळे नाहीत. वीजेच्या वितरणसाठी प्राथमिक आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे महावितरणचे प्रयत्न असणार आहे.
लोकेश चंद्र यांनी वीज पुरवठ्यासंदर्भात महावितरणच्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. वीजदर निश्चितीच्या प्रस्तावावर वीज नियामक आयोगाने दर कपातीचे आदेश दिले.
हे ही वाचा: थेट गँगस्टरच्या आईला केलं ठार, गोळ्या झाडल्या अन्.. कोण आहे 'हा' गँगस्टर जग्गू?
वीजेचे समान दर
महावितरण अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यभरातील वीज ग्राहकांना कमी दरात वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात आणि मुंबईसह उपनगरांमध्ये समान दरात वीज वितरण केले जाईल. मुंबईसाठी स्वतंत्र कंपनी नसून तिथल्या वीज ग्राहकांना आपल्याकडे वळते करण्याचे आव्हान असणार आहे.