Bhaubeej 2023 Date Shubh Muhurt: भाऊबीजेसाठी एवढाच वेळ, ‘हा’ आहे शुभ मुहूर्त
Bhaubeej 2023 Date and Shubh Muhurt:यंदा भाऊबीजेचा सण 15 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. यावेळी भाऊबीजेसाठी दोन शुभ मुहूर्त आहेत. जाणून घ्या त्याविषयी सविस्तर.
ADVERTISEMENT
Bhaubeej 2023 Shubh Muhurt: दिवाळीनंतर, कार्तिक शुक्ल द्वितीयेला भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. ही तिथी यमराजाशी संबंधित असल्यामुळे तिला यम द्वितीया असेही म्हणतात. या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्याची कामना करतात. या दिवशी बहिणीने ओवाळणी केलेल्या भावाचा अकाली मृत्यू होत नाही, असे मानले जाते. यंदा भाऊबीजेचा सण बुधवार, 15 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. आम्ही तुम्हाला भाऊबीजेचा शुभ मुहूर्त आणि पूजाविधीबाबत सांगणार आहोत. (just this much time for tilak on bhai dooj note down the auspicious time Bhaubeej 2023 date shubh muhurt)
ADVERTISEMENT
भाऊबीजेचा शुभ मुहूर्त (Bhaubeej 2023 Shubh Muhurt)
यावर्षी भाऊबीज ओवाळणीचे दोन शुभ मुहूर्त आहेत. पहिला शुभ मुहूर्त 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.44 ते 9.24 पर्यंत आहे. तर दुसरा शुभ मुहूर्त हा सकाळी 10.40 ते दुपारी 12 पर्यंत आहे.
भाऊबीजेचा दिवशी पूजा करण्याची पद्धत काय आहे? (Bhaubeej 2023 puja vidhi)
भाऊबीजेच्या दिवशी भावाने पहाटे चंद्र पाहून शुद्ध पाण्याने स्नान करावे. भावाला ओवाळण्यासाठी बहिणीने आरतीचे ताट सजवावे. त्यात कुंकू, शेंदूर, चंदन, फळे, फुलं, मिठाई आणि सुपारी इत्यादी गोष्टी ठेवाव्यात. टिळा लावण्यापूर्वी तांदळाची रांगोळी काढावी त्यावर चौरंग ठेवून त्यावर भावाला बसवावे आणि बहिणींनी शुभ मुहूर्तावर त्याला ओवाळणी करावी. त्यानंतर भावाला फुलं, सुपारी, बताशा आणि काळे हरभरे अर्पण करून त्यांची आरती करावी. त्यानंतर भावांनी आपल्या बहिणींना भेटवस्तू भेट द्याव्यात आणि त्यांचे नेहमी रक्षण करण्याचे वचन द्यावे.
हे वाचलं का?
हे ही वाचा>> शंख वाजवण्याचे प्रचंड फायदे, वास्तुदोषच नाही तर…
भाऊबीजेच्या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी बहिणी यम द्वितीयेचे व्रत देखील ठेवतात. भाऊबीजेच्या दिवशी यमराजासह चित्रगुप्त यांचीही पूजा केली जाते. भाऊबीजेच्या दिवशी यमराज आणि चित्रगुप्त यांची पूजा कशी केली जाते ते जाणून घेऊया.
यमदेवाची पूजा कशी करावी? (Bhaubeej 2023 Yam Devta)
भाऊबीजेच्या दिवशी संध्याकाळी घराच्या डाव्या बाजूला पाण्याने भरलेले मातीचे भांडे ठेवावे. त्यावर मोहरीच्या तेलाचा चार बाजू असलेला दिवा लावावा. घरात राहणारे सर्वजण दीर्घायुष्य व निरोगी राहावेत ही प्रार्थना करावी. दुसऱ्या दिवशी सकाळी कलशातील पाणी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडावे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा>> IAS सृष्टी देशमुखची लव्ह स्टोरी, IAS नागार्जुनसोबत कशी झाली होती भेट?
या दिवशी चित्रगुप्ताची पूजा कशी करावी?
भाऊबीजेच्या दिवशी सकाळी पूर्व दिशेला चौकोन बनवा. त्यावर भगवान चित्रगुप्ताची मूर्ती स्थापित करा. त्यांच्यासमोर तुपाचा दिवा लावावा. फुले व मिठाई अर्पण करा. यानंतर एका पांढऱ्या कागदावर हळद लावून त्यावर “श्री गणेशाय नमः” असे लिहावे. नंतर 11 वेळा “ओम चित्रगुप्ताय नमः” लिहा. भगवान चित्रगुप्ताकडे ज्ञान, बुद्धी आणि लेखनाचं वरदान मागावं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT