तिच्या प्रेमात आकंठ बुडालेला, लग्नही केलं; पण आता चार्जरच्या वायरनेच.. सोलापूर हादरलं!

मुंबई तक

solapur crime news : सोलापूरमध्ये एका धक्कदायक घटना उघडकीस आली. पतीने एका चार्जरच्या वायरने पत्नीचा गळा आवळून हत्या केली.

ADVERTISEMENT

solapur crime news
solapur crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चार्जरच्या वायरने पतीकडून पत्नीची गळा आवळून हत्या

point

दोन महिन्यांपूर्वी दोघांचाही झाला होता प्रेमविवाह

Solapur Crime News : सोलापूरमध्ये एक धक्कदायक घटना उघडकीस आली. पतीने एका चार्जरच्या वायरने पत्नीचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर पतीनेही त्याच चार्जरच्या वायरने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोलापूर तालुक्यातील उळे गावातील आहे. गोपाळ लक्ष्मण गुंड (वय 30) आणि गायत्री गोपाळ गुंड (वय 22) अशी मृत पती पत्नीची नावे आहेत. केवळ दोन महिन्यांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला होता. या घटनेमुळे सोलापूरमध्ये खळबळ माजली आहे. 

हेही वाचा : बाथरूममध्ये जाऊन पत्नी फोनवर.. पतीला वाटलं 'नको ते' करते, ठेचून-ठेचून मारलं!

एकूण घटनाक्रम

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण सोलापूरातील उळे गावातील लक्ष्मण गुंड आणि गायत्री गुंड यांचा नुकताच प्रेमविवाह झाला होता. ते आयुष्याच्या चांगल्या टप्प्यावर होते कारण त्यांच्या संसाराला नुकतीच सुरुवात झाली होती. आषाढी एकादशी निमित्ताने त्यांचे कुटुंबीय हे किर्तनासाठी बाहेर गेले होते. रात्री उशिरा घरी परतल्यानंतर कुटुंबियांना गायत्री आणि गोपाळचा मृतदेह आढळून आला. 

हेही वाचा : 'त्याचे' 37 वर्षाच्या महिलेसोबत सुरू होते अनैतिक शारीरिक संबंध, पत्नीला समजलं अन्...

गोपाळने आधी पत्नीला मारलं आणि नंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. गोपाळने असं का केलं असावं? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे कारण आता अद्यापही समोर आलेलं नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि घटनेचा तपास सुरु केला. मात्र, या घटनेमुळे सोलापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

बार्शीत लेकाने वडिलाची केली हत्या 

दरम्यान, सोलापूरातील बार्शी तालुक्यातील वाणेवाडी गावात आर्थिक कारणातून मुलानेच आपल्याच वडिलांची हत्या केली. रावण सोपान खरंगुळे (वय 70) असं मृत्यू झालेल्या वडिलांचं नाव आहे. तर अनंतराव उर्फ अनिल रावण खरंगुळे याच मुलाने आपल्याच वडिलांना काठीने आणि चाबकाने मारहाण करून मारहाण केली. यामुळे त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या. मुलाने केलेल्या अशा हैवानी कृत्याचे कारण समोर आलं आहे. वडिलांनी बैल विकला होता, त्यातून आलेले पैस न दिल्याने लेकानेच वडिलांची हत्या केली. 

हे वाचलं का?

    follow whatsapp