Ladki Bahin Yojana: महिलांनो, आता थेट 'या' दिवशी खात्यात येणार पैसे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ladki bahin yojana scheme these women get benefit of 5500 diwali bonus mykhymantri ladki bahin yojana
लाडक्या बहिणींना 5500 रूपयांचा दिवाळी बोनस मिळणार
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडक्या बहिणींना आता थेट कधी मिळणार पैसे?

point

महिलांना ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे मिळाले

point

तुमच्या खात्यात पैसे जमा होणार का?

Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे हे एकत्र देण्यात आले आहेत. पण यासाठी काही अटी देखील आहेत. या अटीत बसणाऱ्या महिलांनाच सरकारकडून पैसे मिळत आहेत. पण आता महिलांना पुढील हप्ता नेमका कधी मिळणार याविषयी जाणून घेऊयात.

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात 3000 रूपये आणि 7500 रूपये जमा झाले होते. यामध्ये ज्या महिलांना सप्टेंबरचा हप्ता आधीच मिळाला होता त्यांच्या खात्यात ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रित मिळून 3000 रूपये जमा झाले आहेत. तर ज्या महिलांच्या खात्यात तीन हप्त्यापर्यंत एकही रूपया जमा झाला नव्हता. त्या महिलांच्या खात्यात चौथ्या हप्त्यात एकत्रितपणे 7500 रूपये जमा झाले होते. 

हे ही वाचा : ladki Bahin Yojana: ...तरच तुम्हाला मिळणार लाडकी बहीण योजनेचे पैसे! महिलांनो एकदा अटी तर वाचा

दरम्यान हे पैसे जमा झाल्यानंतर आता काही महिलांना पुढील हप्ता नेमका कधी मिळणार याकडे डोळे लागून राहिले आहेत. पण आता महिलांना विधानसभा निवडणुका होईपर्यंत वाट पाहावी लागेल. विधानसभा निवडणूक ही 20 नोव्हेंबरला होणार असून निकाल हा 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. याचा अर्थ महिलांना थेट डिसेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत.

हे वाचलं का?

कोणत्या अटी आवश्यक? 

1) महिलेचं नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सूचीत असलं पाहिजे.
2) त्यांचा आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असलेलं पाहिजे.
3) ही योजना सर्व नियम आणि अटींचं पालन करत आहे.

ज्या महिला या अटीत बसतात त्याच महिलांच्या खात्यात पुढील हप्त्याचे पैसे जमा होणार आहे. पण हे पैसे महिलांच्या खात्यात कधी जमा होणार आहे? याबाबतची कोणतीच अपडेट अद्याप तरी समोर आली नाही आहे. त्यामुळे आता महिलांना यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'ची दिवाळी आणखी गोड, दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रच...

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT