Ahmedabad Plane Crash: अपघात झालेल्या Air India विमानात होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी!

मुंबई तक

Vijay Rupani: अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर लगेचच कोसळले. याच अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील असल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

अपघात झालेल्या Air India विमानात होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी!
अपघात झालेल्या Air India विमानात होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी!
social share
google news

अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर लगेचच कोसळलं. या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 242 लोक होते. अपघातानंतर लगेचच घटनास्थळी पोहोचलेल्या मदत आणि बचाव पथकाने बचाव कार्य सुरू केले आहे. या दरम्यान, एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील अपघातग्रस्त विमानात होते. ते अहमदाबादहून लंडनला जात होते.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी होते अपघातग्रस्त विमानात

विमान अपघातानंतर या विमानातील प्रवाशांची यादीही समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही नाव प्रवाशांच्या यादीत आहे. प्रवाशांच्या यादीत विजय रुपाणी यांचे नाव 12 व्या क्रमांकावर आहे आणि त्यांचा सीट क्रमांक 2 D आहे.

हे ही वाचा>> Air India Plane Crash Video: एअर इंडियाचं विमान असं कोसळलं, थरकाप उडवणारा 'तो' व्हिडिओ आला समोर!

मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाने अहमदाबादमधील सरदार पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुपारी 1.38 वाजता उड्डाण केले आणि दुपारी 1.40 वाजता क्रॅश झाले. हे विमान विमानतळाची सीमाही ओलांडू शकले नाही आणि वर जात असतानाच अचानक खाली येत कोसळलं. त्यानंतर घटनास्थळावरून धुराचे लोट दिसू लागले. दरम्यान, या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील होते. 

गृहमंत्री अमित शहा यांनी अपघाताबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. मदत आणि बचावासाठी अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती बचाव दलाच्या (NDRF) पथकांनाही घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.

नेमका अपघात कसा घडला?

प्राथमिक माहितीनुसार, जेव्हा या विमानाला अपघात झाला तेव्हा त्या विमानात क्रू मेंम्बर्ससह एकूण 242 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा>> Air India Plane Crash Video: एअर इंडियाचं विमान असं कोसळलं, थरकाप उडवणारा 'तो' व्हिडिओ आला समोर!

विमानतळापासून मेघनीनगरचे अंतर सुमारे 15 किमी आहे. अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली. विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये अपघातस्थळावरून आकाशात धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळत आहेत. या दुर्घटनेनंतर आपत्कालीन प्रतिसाद पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनी अद्याप अपघाताचे कारण निश्चित केलेले नाही. मेघनीनगर परिसरातील धारपूर येथून प्रचंड धूर दिसत आहे.

एअर इंडियाच्या या विमानाने (AI-171) दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (IGI विमानतळ) अहमदाबादसाठी उड्डाण केले होते. ज्यानंतर येथे काही वेळ थांबल्यानंतर गुरुवारी (12 जून) दुपारी  लंडनसाठी उड्डाण केलेलं असताना हाँ अपघात झाला.

हे वाचलं का?

    follow whatsapp