NMDC Recruitment: केंद्र सरकारच्या महामंडळात नोकरी... कुठे आणि कराल अर्ज?
राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) कडून तब्बल 995 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

NMDC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी

NMDC कडून 955 पदांसाठी भरती

कुठे आणि कराल अर्ज?
Govt Job: सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणांसाठी केंद्र सरकारच्या नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) कडून तब्बल 995 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. NMDC ने फील्ड असिस्टंट आणि मेंटेनन्स असिस्टंट सारख्या मोठ्या पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार www.nmdc.co.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात. अर्जाची शेवटची तारीख 14 जून 2025 निश्चित करण्यात आली आहे.
काय आहे पात्रता?
या पदानुसार अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून आयटीआय (ITI), तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा पदवीधर पदवी प्राप्त केलेली असावी.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे असणं आवश्यक आहे. तसेच, राखील प्रवर्गातील उमेदवारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. यामध्ये SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षे आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे सूट मिळेल.
अर्जाचे शुल्क
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शुल्क भरावं लागणार आहे. अर्ज करतेवेळी उमेदवारांना 150 रुपये शुल्क ऑनलाइन माध्यमातून भरावं लागेल.
हे ही वाचा: गार्डनमध्ये फिरायला गेले आणि तिथेच अंत झाला.... कमानीचा भाग कोसळून 2 महिलांचा मृत्यू, घटना काय?
निवड प्रक्रिया
NMDC च्या पदांसाठी दोन टप्प्यांमध्ये उमेदवारांची निवड केली जाईल. कंप्यूटर आधारित परीक्षा आणि फिजिकल म्हणजेच शारीरिक क्षमता चाचणी किंवा ट्रेड टेस्ट द्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. पहिल्या टप्प्यात परीक्षार्थींना 100 गुणांचे बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. निवड प्रक्रियेचा दुसरा टप्पा फक्त पात्रता तपासण्यासाठी असेल, म्हणजेच त्यात गुण जोडले जाणार नाहीत परंतु उत्तीर्ण होणं अनिवार्य असेल.
हे ही वाचा: SSC CGL 2025: सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी सोन्यासारखी संधी, तब्बल 14 हजार पद भरणार!
कोणते डॉक्यूमेंट्स आवश्यक?
- पासपोर्ट साइज कलर्ड फोटो
- दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जातीचा दाखला (प्रवर्गानुसार)
- अपंगत्वाचा दाखला (आवश्यक असल्यास)
- स्कॅन केलेली सही
- पदाच्या नियमानुसार शैक्षणिक प्रमाणपत्र
कसा कराल अर्ज?
1. सर्वप्रथन NMDC च्या www.nmdc.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. त्यानंतर होमपेजवर जाऊन 'Careers' सेक्शनमध्ये जा.
3. पेजवरील ऑनलाइन अर्जाच्या लिंकवर क्लिक करुन Application Form भरण्यास सुरुवात करा.
4. यानंतर आवश्यक डिटेल्स भरा.
5. अर्ज भरल्यानंतर तो सबमिट करा.