बापरे..! अमरावतीत दहा वर्षीय मुलीच्या पोटातून काढला अर्धा किलो केसांचा गोळा, डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य
Amravati News : अमरावतीतील एका दहा वर्षांच्या मुलीला केस खाण्याची सवय होती. गेली चार वर्षे ती केस खात होती. त्यामुळे तिच्या पोटात केसांचा गोळा तयार झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुलीच्या पोटात अर्धा किलो केसांचा गोळा

डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य
Amravati News : विदर्भातील अमरावतीत एका मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. एका दहा वर्षांच्या मुलीच्या पोटातून डॉक्टरांनी अर्धा किलोंचे केस काढले आहेत. लहान मुलीला गेली तीन-चार महिन्यांपासून उल्ट्या होत होत्या. एवढंच नाही,तर तिला जेवणही जात नव्हतं, तसेच तिच्या पोटात जळजळ व्हायची. तिच्या नातेवाईकांनी अनेक डॉक्टरांकडे तपासणी केली होती. पण पीडितेला कसलाही फरक जाणवत नव्हता. ही घटना अमरावती ग्रामीण परिसरात राहणाऱ्या तृप्ती नावाच्या पीडितेसोबत घडली आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता, न्यायालयाचा मोठा निर्णय
नेमकं प्रकरण काय?
तृप्तीला अनेकदा उल्ट्या व्हायच्या. भूक लागली तरीही जेवण पोटात जात नव्हते, त्यामुळे तिला अन्नपचनाचा त्रास व्हायचा. अनेक डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले असता, संबंधित डॉक्टर पचनाची समस्या सांगायचे. शेवटी तिच्या कुटुंबीयांनी अमरावतीली बालरोग तज्ज्ञ डॉ. उषा गजभिये यांच्याकडे नेले असता, डॉक्टरांनी पीडितेशी संवाद साधला आणि पीडित मुलीच्या आजाराबाबत तपासणी केली. त्यानंतर त्यांनी मुलीनं केस गिळाल्याचं कारण सांगितलं. हे ऐकून सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला.
तृप्तीच्या पोटात केसांचा गोळा
संबंधित प्रकरणात पीडित मुलीचा एक्स रे काढण्यात आला, त्या एक्सरेत पोटात काही तरी असल्याचं दिसून आलं. डॉक्टरांचा संशय खरा ठरला आणि मुलीचं ऑपरेशन करण्यात आलं. यानंतर मुलीच्या पोटातून अर्धा किलो केसाचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आलं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तृप्तीला गेली चार वर्षांपासून केस खाण्याची सवय होती. घरात कोणीही नसताना ती केस खायची. एक-एक केस खाल्ल्यामुळे तृप्तीच्या पोटात केसांचा गोळा तयार झाला. पोटातील केसांचा गोळा काढल्यानंतर तृप्तीची प्रकृती आता स्थिर आहे.
हेही वाचा : Hit And run Case : सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं निष्पाप तरुणाला चार चाकी वाहनाने चिरडलं, नेमकं 'त्या' रात्री काय घडलं?
डॉक्टरांनी सांगितलं की, नखं खाणे, केस खाण्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची अधिक संभावना असते. त्यांनी सांगितलं की, जर मुलांना अशा समस्या उद्धवत असतील तर त्यांनी लवकरात लवकर मानसिक तज्ज्ञांकडे आपल्या मुलांकडे न्यावं आणि उपचार करावा.