Hit And run Case : सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं निष्पाप तरुणाला चार चाकी वाहनाने चिरडलं, नेमकं 'त्या' रात्री काय घडलं?

मुंबई तक

Hit And run Case : सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं निष्पाप तरुणाला चार चाकी वाहनाने चिरडलं आहे. संबंधित प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत.

ADVERTISEMENT

Hit And run Case (grok)
Hit And run Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देशभरात हिट अॅन्ड रन

point

अभिनेत्रीनं तरुणाला दिली ठोकर

point

नेमकं त्या रात्री काय घडलं?

Hit And run Case : राज्यातच नाही,तर देशभरात हिट अॅन्ड रनसारख्या घटना घडताना दिसतात. हिट अँड रन करणारे दुसरे तिसरे कोणीही नसतात तर ते धनदांडग्यांची मुलं असतात. अशातच आता एका अभिनेत्रीने एका तरुणाला जागेवर चिरडलं आहे. ही अभिनेत्री आसामी चित्रपटातील स्टार आहे. तिनंच हे कृ्त्य केलं आणि निष्पाप तरुणाला जागेवर चिरडलं आहे. संबंधित प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर घटनेचा खुलासा झाला. दरम्यान, आरोपी अभिनेत्रीचं नाव नंदिनी कश्यप असल्याची माहिती समोर आली. ही घटना 25 जुलै रोजी पहाटे 3 वाजता गुवाहटीतील दखिंगगाव परिसरात घडली आहे. आरोपी अभिनेत्री नंदिनीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या  आहेत. 

हे ही वाचा : Mumbai News ! ट्यूशन टीचरने आठ वर्षाच्या मुलाला मेणबत्तीने दिले चटके, कारण ऐकून उडेल थरकाप, वडील संतापले अन्...

अभिनेत्रीनं ज्या तरुणाला चिरडलं त्या तरुणाचे समीउल हक (वय 21) असे नाव आहे. या हिट अँड रनप्रकरणात समीउल हकचा गाडीखाली चिरडून जागेवर मृत्यू झाला आहे. समीउल हक हा नलबारी पॉलेटेक्निकचा विद्यार्थी होता. शिक्षण घेत तो गुवाहाटी महापालिकेत नोकरी करायचा. तो एका लाईट प्रोजेक्टवर काम करून रात्री उशीरा घरी परतत असताना ही घटना घडली.  

घडलेला घटनाक्रम 

घटनास्थळी असलेल्या उपस्थितांनी या घटनेचा एकून घटनाक्रम सांगितला आहे. समीउलला एका भरधार स्कॉर्पिओने चिरडले. प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, अपघातानंतर नंदिनीनं जखमी पीडिताला मदत करण्याऐवजी तिथून पळवाट काढली. या अमानुष कृत्यामुळे लोक संतापले होते. यानंतर काही लोकांनी पीडित जखमी तरुणाला एका रुग्णालयात दाखल केले. परंतु दुखापत गंभीर असल्याने त्या तरुणाचा मृत्यू झाला. 

यावेळी समीउलच्या साथीदारांना धडक दिलेल्या कारचा पाठलाग केला असता, नंदिनी काहिलीपारा येथील एका अपार्टमेंटमध्ये लपून बसली होती. समीउलच्या मित्राने नंदिनीला विचारले असता, समीउलच्या मित्रांच्यात आणि नंदिनीमध्ये वाद झाला. त्यांच्या वादाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं. 

हे ही वाचा : शनि आणि बुध वक्रीमुळे काही राशीतील लोकांच्या आयुष्याला मिळेल कलाटणी, जागतिक पातळीवर होईल उलाढाल

नंदिनी कश्यपला अटक 

गुवाहाटी पोलीस डीसीपी जयंत सारथी बोरा यांनी पत्रकारांना सांगितलं की, हिट अँड रनप्रकरणात अभिनेत्री नंदिनी कश्यपला अटक करण्यात आली आहे. यापूर्वीही जामीनपात्र कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे आम्ही केवळ चौकशी केली होती. त्यानंतर त्यांनी न्यायालयात हजर करण्याबाबतही सांगितलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp