55 वर्षीय व्यक्तीवर प्राणघातक हल्ला, डोळे फोडून गुप्तांगाचा केला चेंदामेंदा, काळीज पिळवटून टाकणारा प्रकार

मुंबई तक

crime news : एका 55 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. एवढंच नाहीतर त्या व्यक्तीच्या डोळ्यांसह प्रायव्हेट पार्टवर देखील हल्ला करण्यात आला होता.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

55 वर्षीय व्यक्तीची हत्या

point

डोळ्यांसह प्रायव्हेट पार्टवर देखील हल्ला

crime news : बिहारमधील छपरा जिल्ह्यात एका मध्यमवयीन व्यक्तीची निर्घृन हत्या करण्यात आली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मांझी नगरपंचायतीच्या दक्षिण टोला येथे घडली आहे. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव सूरज प्रसाद (वय 55) असे आहे. एका खोलीत व्यक्तीचा मृतदेह हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. गुन्हेगारांनी त्यांच्या दोन्ही डोळ्यांसह गुप्तांगावर देखील हल्ले करण्यात आले होते. 

हे ही वाचा : पुणे : आरोपी बंडू आंदेकर पुणे महापालिका निवडणूक लढवणार, न्यायालयानं दिला महत्त्वाचा निर्णय

नेमकं काय घडलं? 

जेव्हा शेजारचे त्यांना जेवण देण्यासाठी आले, तेव्हा त्यांना खोलीचा दरवाजा उघडा दिसला होता. काहीतरी काळंबेर परिस्थिती निर्माण झाल्याची भिती निर्माण झाली होती, जाताना त्यांना सूरज प्रसादचा मृतदेह आढळून आला होता, त्यावर गंभीर जखमा देखील होत्या. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. हे प्रकरण रात्री घडल्याचा कुटुंबियांनी संशय व्यक्त केला.

फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास केला..

या घटनेची चौकशी करण्यासाठी फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले होते. फॉरेन्सिक पथकाने पुरावे आणि रक्ताने माखलेली माती गोळा केली आणि घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली होती. मांझी पोलीस ठाण्याचे अधिकारी देव आशिष हंस यांनी सांगितलं की, ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय आहे. गुन्हेगार हा मृत व्यक्तीचा चांगलं ओळख होता किंवा ते बराच काळ त्याचा पाठलाग करत होते.

हे ही वाचा : तरुणांनी झोमॅटोवरून मागवलं चिकन, जेवणात आढळली पाल, नंतर तरुणाला झाल्या उलट्या अन्...

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि नंतर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला होता. या प्रकरणात पोलीस जवळच्या रहिवाशांची चौकशी करत आहेत आणि अनेक संशयितांची ओळख पटवण्यात आली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात आता आरोपींवर कठोर कारवाई करण्याची पोलिसांकडे मागणी केली जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp