ब्रेकअपच्या 2 महिन्यानंतरच बॉयफ्रेंडने दुसऱ्या तरूणीला केलं प्रेग्नंट, पहिली गर्लफ्रेंड म्हणाली बाईईई...

मुंबई तक

डिजायरी एलन (Desiree Allen)नावाच्या एका महिलेने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या बॉयफ्रेंडने तिच्यासोबत ब्रेकअप केल्यानंतर केवळ दोन महिन्यांतच दुसऱ्या महिलेला गरोदर केले.

ADVERTISEMENT

after breakup with his girlfriend and young man got another woman pregnant within 2 months She said I want to be a stepmother
फोटो सौजन्य: Instagram
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ब्रेकअप झाल्यानंतर 2 महिन्यांतच केलं दुसऱ्या महिलेला गरोदर

point

महिलेने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ

Viral Story: आपल्या देशात नात्यामधील विश्वासघात म्हणजे मोठा धोका मानला जातो. परंतु परदेशात लोक ब्रेकअपसारख्या गोष्टींचा वेगळ्याच प्रकारे विचार करतात. अशीच एक अविश्वसनीय आणि चकित करणारी गोष्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय. ही गोष्ट डिजायरी एलन (Desiree Allen)नावाच्या एका महिलेची शेअर केली असून तिच्या बॉयफ्रेंडने तिच्यासोबत ब्रेकअप केल्यानंतर केवळ दोन महिन्यांतच दुसऱ्या महिलेला गरोदर केले.

मुलाची सावत्र आई बनण्यास तयार...

आश्चर्याची बाब म्हणजे डिजायरीला आपल्या आधीच्या प्रियकराबद्दल ही बातमी कळताच वाईट वाटलं नाही. उलट तिने ही गोष्ट अगदी मनापासून स्वीकारली आणि आता ती त्याच्या मुलाची सावत्र आई बनण्यास तयार असल्याचं तिने सांगितलं. 27 वर्षीय डिजायरीने सोशल मीडियाच्या माध्यमातून एका व्हिडिओमध्ये ही गोष्ट शेअर केली. तिच्या या व्हिडीओला 70 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळत असल्याचं पाहायला मिळतंय.

या व्हिडीओमध्ये डिजायरी म्हणाली, "मी माझ्या प्रियकरापासून 2 महिने ब्रेक घेतला आणि त्यादरम्यान त्याचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करुन तिला गर्भवती केलं. त्यामुळे, आता मला त्याच्या लाडक्या मुलीला वाढवण्याची संधी मिळेल." डिजायरीने याबद्दल एक व्हिडीओ पाहिला होता.तो व्हिडीओ तिचा बॉयफ्रेंड आणि संबंधित दुसऱ्या महिलेच्या जेंडर रीव्हील कार्यक्रमातील असल्याचं तिने सांगितलं. व्हिडिओमध्ये, त्या जोडप्याने कुटुंबियांसमोर गुलाबी रिबन कापून त्यांनी मुलगी होण्याची इच्छा व्यक्त केली.

हे ही वाचा:  मोठी बातमी! मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता, न्यायालयाचा धक्कादायक निर्णय

महिलेने सांगितली 'ती' गोष्ट

तसेच, "मी गरोदर नसले तरी माझं मन आधीच माझ्या आधीच्या प्रियकराच्या बाळाप्रति प्रेमानं भरलेलं आहे," डिजायरीला 9 वर्षे, 5 वर्षे आणि 3 वर्षे वय असलेली तीन मुलं असल्याचं देखील तिने सांगितलं. ही बातमी अगदी मनापासून स्विकारल्याचं डिजायरीने सांगितलं. ती म्हणाली, "प्रत्येक गोष्टीसामागे देवाची काहीतरी योजना असते!" तिच्या या विचाराने अनेकांना मोठा धक्का बसला. नेटकरी यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत असल्याचं दिसून येत आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp