एअर इंडियाचं विमान नव्हे तर आगीचा गोळा, अपघाताचे हादरवून टाकणारे Videos
अहमदाबाद एअरपोर्टजवळीळ एअर इंडिया विमानाच्या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये नेमकं काय दिसतंय? पाहा...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अहमदाबाद एअरपोर्टजवळ एअर इंडिया विमानाचा मोठा अपघात
Air India विमान क्रॅशचा नवा व्हिडीओ
Air India विमान अपघाताचे व्हिडीओज
Air India Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद एअरपोर्टजवळ एअर इंडिया विमानाचा मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे आंतरराष्ट्रीय विमान अहमदाबादहून लंडनला जात होतं. या भीषण अपघातानंतर सर्वत्र काळा धूरच दिसत होता आणि आता बचावकार्यासाठी अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
अपघाताचा व्हिडीओ आला समोर
या धक्कादायक विमान अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये विमान आकाशात उडल्यानंतर काही सेकंदात जमिनीवर कोसळताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान जवळपास 400 फूट उंचीवरून कोसळताना दिसत आहे. विमान जमिनीवर पडताच त्याचं आगीच्या गोळ्यात रुपांतर होऊन मोठा स्फोट झाल्याचं दिसत आहे. यानंतर रेस्क्यूचे व्हिडीओ सुद्धा समोर आले आहेत. या व्हिडीओंमध्ये सर्व काही राख आणि ढिगाराच दिसून येत आहे.
मेघानी नगर या रहिवासी भागात विमान कोसळलं आणि यामुळे आजूबाजूच्या इमारतींनाही आग लागली आहे. एअरपोर्टपासून मेघानी नगरचे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे. अपघातानंतर लगेच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग विझवण्यास सुरुवात केली. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी अनेक रुग्णवाहिका देखील घटनास्थळी पोहोचल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानात एकूण 242 लोक होते. यामध्ये दोन पायलट, 12 क्रू मेंबर्स आणि 230 प्रवाशांचा समावेश आहे. गुरुवारी दुपारी 1:38 वाजता विमानाने उड्डाण केले आणि अवघ्या दोन मिनिटांत दुपारी 1:40 वाजता ते जमिनीवर कोसळले. अहमदाबाद पोलिस नियंत्रण कक्षानेच याची पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान अहमदाबादहून लंडनला जात होते आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मेघानी नगरजवळ ते कोसळले.
